व्यसनमुक्तीची जबाबदारी समित्यांवर
By Admin | Updated: May 6, 2015 01:58 IST2015-05-06T01:58:05+5:302015-05-06T01:58:05+5:30
शासन निर्णय आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राच्या अनुषंगाने घाटंजी तालुकास्तरीय व्यसनमुक्ती कार्यसमिती गठित करण्यात आली आहे.

व्यसनमुक्तीची जबाबदारी समित्यांवर
ंघाटंजी : शासन निर्णय आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राच्या अनुषंगाने घाटंजी तालुकास्तरीय व्यसनमुक्ती कार्यसमिती गठित करण्यात आली आहे. कार्यसमितीत नियुक्त अधिकारी आणि प्रतिनिधींनी आपापल्या कार्यक्षेत्रात व्यसनमुक्तीबाबत प्रचार आणि प्रसार करावयाचा आहे.
समितीत अध्यक्ष म्हणून तहसीलदार एम.एम. जोरवर, कार्यकारी अध्यक्ष गटविकास अधिकारी उत्तम मानकर, सदस्य म्हणून कांताबाई हेडारकर, मंदा निमकर, गटशिक्षणाधिकारी रावसाहेब जुमनाके, प्रतिनिधी म्हणून प्राचार्य एम.एच. शहजाद, प्राचार्य डी.टी. तेलगोटे, शंकरराव चुनारकर, विठ्ठलराव डंभारे, खडसे, सरपंच मंदा कानिंदे, रेखा पेंचलवार, लक्ष्मी आत्राम, प्रियंका धांदे, पंचायत समिती सदस्य सुवर्णा निकोडे, रत्नमाला कोंडेकर, दिलासा संस्थेचे धस, रसिकाश्रय संस्थेचे नितीन पवार, अनंत नखाते, महेश पवार, अशोक हेमके, विठ्ठलराव कांबळे, किशोरी चौधरी, संगीता भुरे, महेंद्र देवतळे, कैलास कोरवते, मधुकर निस्ताने, हरिभाऊ पेंदोर, घाटंजीचे ठाणेदार भारत कांबळे, पारव्याचे ठाणेदार वावरे, सदस्य सचिव म्हणून निवासी नायब तहसीलदार व्ही.एस. तोटे यांची नियुक्ती करण्यात आली. या समितीच्या पदाधिकारी, सदस्यांवर तालुक्यात व्यसनमुक्तीसाठी प्रसार आणि प्रचाराची जबाबदारी आहे. (तालुका प्रतिनिधी)