प्रतिसाद फाऊंडेशनच्यावतीने माजी सैनिकांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 21:51 IST2018-08-27T21:51:26+5:302018-08-27T21:51:40+5:30
येथील बचत भवनात प्रतिसाद फाऊंडेशनच्यावतीने माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी यांचा सत्कार करण्यात आला.

प्रतिसाद फाऊंडेशनच्यावतीने माजी सैनिकांचा गौरव
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील बचत भवनात प्रतिसाद फाऊंडेशनच्यावतीने माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपवनसंरक्षक भानुदास पिंगळे तर प्रमुख पाहुणे म्हणून लेफ्टनंट कर्नल जाधव, जिल्हा सैनिक अधिकारी सदाफळे, दालूराम बोरले, प्रतिसाद फाऊंडेशनचे अध्यक्ष मनोज गुल्हाने होते. माजी सैनिक गंगाधर सोमन, जगन्नाथ कचरे, तुळशीदास आत्राम, बुऱ्हान अली, विजय जयस्वाल, विवेक पांडे, विनोद आरेवार, पंकज वसानी, प्रसाद टोणे, सैैैैैैय्यद अब्दूल शहा, नितिन लखाणी, संतोष उडेकर, अनिल भागवत, काजी नरोद्दीन रफोद्दीन, दादाराव बोदरे, धनाजी वाघ, वसंत केंद्रे, सुरेश मडावी, मदन लबडी, उदय भोरे, पुरुषोत्तम पावडे, राजकुमार उरकुडे, नरेश ढाले, राजेंद्रकुमार राजगुरे, धनंजय शिरसाट, विनोद बनाटे, प्रकाश आठवले, शरद गावंडे, पी.एस. मिरासे, मनोज तामगाडगे, धनराज शेगेकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रयास फाऊंडेशनचे कावलकर, डॉ. स्वप्नील मानकर, राजू जॉन, नितीन कुनकर, शाम जोशी, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बालाजी शेंडगे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक अॅड. हर्षल राठोड, संचालन प्रलय टिप्रमवार यांनी तर आभार रवी माहूरकर यांनी मानले.