कायदेविषयक ज्ञानदान शिबिराला प्रतिसाद
By Admin | Updated: November 4, 2016 02:08 IST2016-11-04T02:08:24+5:302016-11-04T02:08:24+5:30
तालुका विधीसेवा समिती आणि वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने निंभोरा येथे कायदेविषयक ज्ञानदान शिबिर घेण्यात आले.

कायदेविषयक ज्ञानदान शिबिराला प्रतिसाद
कळंब : तालुका विधीसेवा समिती आणि वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने निंभोरा येथे कायदेविषयक ज्ञानदान शिबिर घेण्यात आले. अध्यक्षस्थानी न्यायाधीश टी.एच. शेख होते.
प्रमुख पाहुणे म्हूणन तहसीलदार रणजित भोसले, अॅड.मोहनापूरे, अॅड.तेलंगे, विस्तार अधिकारी अशोक ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक रंगनाथ जगताप, विधा सेवा समिती सदस्य अशोक उमरतकर आदी उपस्थित होते. सुरूवातीला तहसीलदार रणजित भोसले यांनी शासकीय योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली.
अॅड.मोहनापूरे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या कायद्याची माहिती दिली. सामाजिक कार्यकर्त्या अँड.गुरनूले यांनी महिलांना कौटुंबिक हिंसाचार व खावटी याविषयी माहिती दिली. न्यायधीश टी.एच.शेख यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये ‘मानसिक आरोग्य व कायदा’ या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचालन अॅड तेलंगे यांनी तर आभार ग्रामसेवक सचिन डफरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर.बी. डगवार, एस.आर. भगत, सरपंच निळकंठ कुळसंगे, उपसरपंच गजानन मुके आदींनी पुढाकार घेतला.
(तालुका प्रतिनिधी)