अंशकालीन शिक्षकांचे आमदारांना साकडे
By Admin | Updated: February 11, 2015 00:12 IST2015-02-11T00:12:40+5:302015-02-11T00:12:40+5:30
अंशकालीन शिक्षकांना त्वरित कामावर घ्यावे या मागणीचे निवेदन शिक्षक संघटनेतर्फे शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांना देण्यात आले.

अंशकालीन शिक्षकांचे आमदारांना साकडे
घाटंजी : अंशकालीन शिक्षकांना त्वरित कामावर घ्यावे या मागणीचे निवेदन शिक्षक संघटनेतर्फे शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांना देण्यात आले.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद, नगरपरिषद आणि महानगरपालिका या शाळांमध्ये २०१२-१३ या सत्रामध्ये अंशकालीन कला, कार्यानुभव आणि क्रीडा निदेशक म्हणून १८ हजार शिक्षक नियुक्त करण्यात आले. मात्र ३१ मार्च २०१३ च्या आदेशानुसार या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे निदेशकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या शिक्षकांना कायम नियुक्ती देण्याचे आदेश दिले. मात्र शासनाकडून टाळाटाळ सुरू आहे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदन देताना राज्य प्रसिद्धी प्रमुख तथा जिल्हाध्यक्ष जितेंद्र जुनगरे, रवींद्र शेंडे, अमोल शेंडे, संदीप बिजेवार, रजनी धांदे, जगदीश बोढाले, सीमा ढोके आदींची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)