निवासी डॉक्टरांचे कामबंद

By Admin | Updated: August 24, 2014 00:14 IST2014-08-24T00:14:34+5:302014-08-24T00:14:34+5:30

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ४९ निवासी डॉक्टरांनी सोलापूर घटनेच्या निषेधार्थ एक दिवसाचे कामबंद आंदोलन केले.

Resident doctors work | निवासी डॉक्टरांचे कामबंद

निवासी डॉक्टरांचे कामबंद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय : सोलापूरच्या घटनेचा निषेध
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ४९ निवासी डॉक्टरांनी सोलापूर घटनेच्या निषेधार्थ एक दिवसाचे कामबंद आंदोलन केले.
सोलापूरचे निवासी डॉक्टर किरण जाधव यांनी मानसिक आणि शारीरिक तणावातून आत्महत्या केली. या डॉक्टरच्या मृत्यूला जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी निवासी डॉक्टरच्या मार्ड संघटनेने केली आहे. याशिवाय शासनकडे अनेक मागण्या प्रलंबित आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. निवासी डॉक्टरांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कामबंद आंदोलन करण्यात आले.
निवासी डॉक्टरांच्या कामाचे तास निश्चित करावे, डॉ. किरण जाधव यांच्या कुटुंबीयांना शासनाने ५० लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी दक्षता समिती स्थापन करावी, सेंट्रल रेसीडंसी स्किम लागू करावी, निवासी अधिकारी, अधिव्याख्याता आणि सहयोगी प्राध्यापक, तृतीय श्रेणी आणि चतूर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे तत्काळ भरावी अशी मागणी केली आहे.
डॉ. किरण जाधव यांच्या कुटुंबियाना अर्थिक मदत म्हणून सर्व निवासी डॉक्टरांनी एक दिवसाचे विद्यावेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील चार हजार डॉक्टरांनी विद्यावेतन दिले आहे. आंदोलन करताना अतिदक्षता विभागातील डॉक्टर उपस्थित होते. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी संघटनेने हा निर्णय घेतला, असे ‘मार्ड’चे यवतमाळ अध्यक्ष हर्षल पोपटकर यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Resident doctors work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.