मुस्लीम समाजाला आरक्षण लागू करावे

By Admin | Updated: December 11, 2015 03:06 IST2015-12-11T03:06:34+5:302015-12-11T03:06:34+5:30

मुस्लिम समाजाला पाच टक्के शैक्षणिक व शासकीय सेवेत आरक्षण लागू करावे, असे निवेदन जमियतुल उलमा ए हिन्द, यवतमाळच्या...

Reservation should be applied to Muslim community | मुस्लीम समाजाला आरक्षण लागू करावे

मुस्लीम समाजाला आरक्षण लागू करावे

जमीयतुल उलमा ए हिन्द : नागपूर येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना निवेदन
यवतमाळ : मुस्लिम समाजाला पाच टक्के शैक्षणिक व शासकीय सेवेत आरक्षण लागू करावे, असे निवेदन जमियतुल उलमा ए हिन्द, यवतमाळच्या वतीने मुख्यमंत्री व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना देण्यात आले.
मंगळवारी नागूपर येथे दीक्षाभूमी ते विधान भवनावर धडक मोर्चा काढण्यात आला. यामध्ये हजारोंच्या संख्येत मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन दिल्यानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे व काँग्रेसचे आमदार आदींसोबत मुस्लिम समाजाला आरक्षण व विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी यवतमाळ जिल्हा जमीयतुल उलमा ए हिन्दचे अध्यक्ष व गौसिया मस्जिदचे इमाम हाफीज इब्राहिम खान, वजाहत बेग मिर्झा, सिकंदरभाई, मनवर शाह, अफसर बेग मिर्झारू मोहम्मदभाई, हाफीज शब्बीर खान यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. मोर्चात यवतमाळ जिल्ह्यातील असंख्य मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Reservation should be applied to Muslim community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.