पोलीस पाटलांचे आरक्षण

By Admin | Updated: September 11, 2015 02:56 IST2015-09-11T02:56:29+5:302015-09-11T02:56:29+5:30

वणी व मारेगाव तालुक्यात पोलीस पाटीलांची ३९ पदे रिक्त आहे. या पदांसाठी सोमवारी येथील महसूल भवनात आरक्षण जाहीर करण्यात आले.

Reservation of Police Patrol | पोलीस पाटलांचे आरक्षण

पोलीस पाटलांचे आरक्षण

३९ पदे : वणी, मारेगाव तालुक्यातील रिक्त जागा भरणार
वणी : वणी व मारेगाव तालुक्यात पोलीस पाटीलांची ३९ पदे रिक्त आहे. या पदांसाठी सोमवारी येथील महसूल भवनात आरक्षण जाहीर करण्यात आले.
वणी तालुक्यातील राजूर, पुरड (नेरड), लालगुडा व मारेगाव तालुक्यातील मार्डी व कोसारा येथील पोलीस पाटील पद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आहे. कोलगाव (सा.) व पळसोनी येथील पद अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित आहे. वणी तालुक्यातील शिरगिरी, दहेगाव (डो.), पोहणा, शेवाळा, डोंगरगाव व मारेगाव तालुक्यातील पांडविहिर, कान्हाळगाव (वाई), खंडणी, सराटी व खैरगाव येथील पाटीलकी अनुसूचित जमातीसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहे. कान्हाळगाव, कळमना (खु.), बोरी (खु.), हिवरधरा व खैरगाव (भेदी) येथील पद अनुसूचित जमाती प्रवर्गात्ील महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. कायर येथील पोलीस पाटील पद विशेष मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. वणी तालुक्यातील नायगाव (बु.), कळमना (बु.), मारेगाव (को.) येथील पद विमुक्त जाती (अ) प्रवर्गासाठी राखीव आहे, तर रासा व मोहोर्ली येथील पद विमुक्त जाती (अ) महिलांसाठी राखीव आहे. गोपालपूर (खा.) येथील पद भटक्या जाती (क) प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. वणी तालुक्यातील निळापूर येथील पद भटक्या जाती (ड) प्रवर्गासाठी, तर चिखलगाव येथील पद भटक्या जाती (ड) प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित करण्यात आले आहे. वणी तालुक्यातील पठारपूर व मुंगोली, मारेगाव तालुक्यातील पार्डी (मार्डी), दांडगाव, वनोजा (देवी), गोरज, मुक्टा येथील पाटीलकी इतर मागास वर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. डोंगरगाव, शेलू (खु.) व मानकी येथील पद इतर मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. वणी तालुक्यातील नांदेपेरा, पुनवट, उकणी, मंदर, येनक, खांदला, नवेगाव, ढाकोरी, शिवणी (ज.), पिंपरी (को.) व मारेगाव तालुक्यातील हटवांजरी, डोलडोंगरगाव, पांढरकवडा, पाथरी येथील पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे. सावंगी, विरकुंड (विठ्ठलनगर), कोरंबी, घोडदरा व अहेरी येथील पद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले. आरक्षण ऐकण्यासाठी वणी व मारेगाव तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. उपविभागीय अधिकारी शिवानंद मिश्रा, तहसीलदार रणजित भोसले, शिरस्तेदार विवेक पांडे, लिपीक जितू पाटील यांनी आरक्षण जाहीर केले. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Reservation of Police Patrol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.