आरक्षणासाठी धनगर समाजाच्या पाठीशी

By Admin | Updated: February 12, 2015 01:47 IST2015-02-12T01:47:59+5:302015-02-12T01:47:59+5:30

आरक्षण अंमलबजावणीसाठी धनगर समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. प्रसंगी शासनात समाजाचे प्रतिनिधीत्व करू असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

For the reservation the people of Dhangar community | आरक्षणासाठी धनगर समाजाच्या पाठीशी

आरक्षणासाठी धनगर समाजाच्या पाठीशी

नेर : आरक्षण अंमलबजावणीसाठी धनगर समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. प्रसंगी शासनात समाजाचे प्रतिनिधीत्व करू असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
धनगर समाज संघटनेतर्फे येथे ना. राठोड आणि आमदार राम शिंदे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष पवन जयस्वाल, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती लता खांदवे, सदस्य प्रवीण शिंदे, महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय शिंदे पाटील, बाळासाहेब शिंदे , पंचायत समिती सदस्य पद्माकर ढोमणे, मिनाताई खांदवे, मायाताई राणे, बाबू पाटील जैत, बाबाराव भगत, रमेश तुपटकर, हरीश्चंद्र वाघमोडे, विलास बांडे, काळे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. बाळासाहेब शिंदे, श्रीधर मोहोड, प्रवीण शिंदे, लताताई खांदवे, नंदकुमार कापडे, नामदेवराव खोब्रागडे, वैशाली मासाळ, रवीपाल गंधे यांची समायोचित भाषणे झाली. संजय शिंदे पाटील म्हणाले, भाजप-सेनेने निवडणुकीत धनगर समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले होते. केंद्रात भाजपाचे सरकार येवून आठ महिने तर राज्यात तीन महिने झाले. मात्र आश्वासनाची पूर्तता झाली नाही. त्यामुळे आरक्षणासाठी आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, त्याला मंत्र्यांनी साथ द्यावी. अध्यक्षीय भाषणात प्रा. सदाशिवराव नरोटे यांनी समाजाच्या व्यथा मांडल्या. प्रास्ताविक मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय खरात, संचालन प्रभूचरण कोल्हे यांनी तर आभार प्रमोदिनी मुंदाने यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रशांत मासाळ, शिवचरण कोल्हे, संतोष मुंदाने, रवी मुंदाने, राजेंद्र ढगे, जितेंद्र गायनर, राजेंद्र निघोट, रामचंद्र महल्ले, साहेबराव तुपटकर, भास्कर तुपटकर, संतोष घुरडे, नरेश मुंदाने, लक्ष्मण खांदवे, रामभाऊ गायनर, दिनेश ढगे, रमेश लोथे, बंडू काळे, गजानन गायनर, लोमहर्ष गायनर, मधुकर उघडे, सतीश चवात आदींनी पुढाकार घेतला. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: For the reservation the people of Dhangar community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.