जैन समाजाचे तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 21:54 IST2017-08-24T21:53:52+5:302017-08-24T21:54:13+5:30
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जैन मुनी संत यांच्यावर अत्यंत हीन भाषेत टीका करून जैन समाजबांधवांच्या भावना दुखविल्या.

जैन समाजाचे तहसीलदारांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जैन मुनी संत यांच्यावर अत्यंत हीन भाषेत टीका करून जैन समाजबांधवांच्या भावना दुखविल्या. त्यामुळे खासदार राऊत यांचा निषेध करून त्यांच्यावर कठोर करावी, असे निवेदन येथील जैन समाजाच्यावतीने तहसीलदारांना देण्यात आले.
खासदार संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य हे निंदनीय आणि सामाजिक भावनेला ठेच पोहोचविणारे असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदन तहसीलदार किशोर बागडे यांना देण्यात आले. यावेळी दीपक कोठारी, नवीन गड्डा, सतीश मेहता, डॉ.प्रदीप मेहता, बबन भागवतकर, सचिन अग्रवाल, रवींद्र कोठारी, यतीन गड्डा, हितेंद्र गड्डा, हर्षील शाह, संजय सिसोदिया, आनंद जैन, दत्तात्रय वंडाले, अभिजित ओसवाल, किशोर कांकरिया, डॉ.प्रशांत रोकडे, सुंदर गड्डा, श्रीपाल सिसोदिया, राजेश बोरा, लक्ष्मीचंद काराणी, बांदे आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.