वादळग्रस्तांच्या मदतीसाठी एसडीओंना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 22:15 IST2018-06-04T22:15:16+5:302018-06-04T22:15:16+5:30
तालुक्यात गत आठवड्यात प्रचंड वादळ होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक घरावरील टीनपत्रे उडून गेली असून वीज खांबही उन्मळून पडली. यासोबतच आंबा, ऊस, केळी आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना शासनाने तत्काळ पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी एका निवेदनातून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

वादळग्रस्तांच्या मदतीसाठी एसडीओंना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : तालुक्यात गत आठवड्यात प्रचंड वादळ होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक घरावरील टीनपत्रे उडून गेली असून वीज खांबही उन्मळून पडली. यासोबतच आंबा, ऊस, केळी आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना शासनाने तत्काळ पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी एका निवेदनातून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
उमरखेड तालुक्यात २७ मे रोजी प्रचंड वादळ आले. या वादळात करोडी, आमला, रांगोळी या गावात प्रचंड नुकसान झाले. आता आठवडा झाला तरी महसूल प्रशासनाने अद्यापपर्यंत सर्वेक्षणाला प्रारंभ केला नाही. काही ठिकाणी कोसळलेले वीज खांब जैसे थे आहे. अनेक शेतकºयांची टीनपत्रे उडाल्याने ते उघड्यावर आले आहे. या शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वीज पुरवठाही खंडित असल्याने अनेक गावे अंधारात आहेत. वीज वितरणसह शासनाने शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी मुकेश फाटे, नंदकुमार जयस्वाल, सुनील देवसरकर, श्रीराम शिंदे, मारोती कदम, पंडित शिंदे, बाबूराव शिंदे, माधव शिंदे, संभाजी शिंदे, संतोष शिंदे, दिगंबर शिंदे, ज्ञानेश्वर येळूतवार, शिवनाथ शिंदे, गजानन जाधव, पांडुरंग शिंदे, श्रीराम गणपत, लक्ष्मीबाई शिंदे, सुरेश शिंदे यांनी केली आहे. या वादळाने होत्याचे नव्हते झाले आहे. शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे. खरिपाच्या तोंडावर नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल दिसत आहे.