मुस्लीम आरक्षणासाठी संघटनांचे निवेदन
By Admin | Updated: April 9, 2015 00:04 IST2015-04-09T00:04:22+5:302015-04-09T00:04:22+5:30
आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या मुस्लीम समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

मुस्लीम आरक्षणासाठी संघटनांचे निवेदन
यवतमाळ : आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या मुस्लीम समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. आॅल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन आणि कुरेशी समाज बहुउद्देशीय संस्थेतर्फे मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी निवेदन देण्यात आले.
सर्व समित्या आयोगाच्या अहवालात मुस्लीम समाजाची आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक स्थिती अत्यंत कमकुवत दाखविली आहे. शिवाय शासनाकडे मुस्लीम समाजाला वेगवेगळ््या प्रमाणात आरक्षण जाहीर करण्याचे सुचविले असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. तसेच मौलाना आझाद अल्पसंख्यक आर्थिक विकास महामंडळातर्फे मंजूर कर्जरोखे अजूनही गरजू आणि होतकरू मुस्लीम तरुणांपर्यंत पोहोचले नाही. जाचक अटी आणि शर्तीमुळे बहुतांश तरुणांना योजनांच्या लाभापासून वंचित रहावे लागले. ही बाबही निवेदनात प्रामुख्याने नमूद करण्यात आली आहे. मुस्लीम समाजाला सर्वच स्तरावर किमान १२ टक्के आरक्षण मंजूर करावे आणि विदर्भातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणीही करण्यात आली आहे.
निवेदन देताना आॅल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनचे जिल्हाध्यक्ष शेख नईम शेख रहीम, कुरेशी समाज बहुउद्देशीय संस्थेचे जिल्हाध्यक्ष हाजी महेबूब कुरेशी आदी उपस्थित होते. विदर्भ शेतकरी विकास परिषद, मुव्हमेंट फॉर पीस अॅन्ड जस्टीस, वेलफेअर पार्टी आॅफ इंडिया, नॅशनल लोकहिंदी पार्टी, जनजागरण बहुउद्देशिय संस्था, रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडिया (खोब्रागडे गट), असोसिएशन आॅफ प्रोटेक्शन सिव्हील राईट युथ विंग, आयडियल रिलिफ विंग, भीमसेना, अल्पा ओमेगा ख्रिश्चन महासंघ, शेतकरी, कामागार संघर्ष परिषद, बळीसंदेश, ओबीसी फोरम, जोहर ग्रुप, जमियत उलेमा-ए-हिंद, विदर्भ रिपब्लीकन विचार मंच आदी संस्था, संघटनांचे पदाधिकारी, सदस्य यावेळी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)