उमरखेड एसडीओंना ‘एमपीजे’चे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 00:10 IST2017-11-25T00:10:30+5:302017-11-25T00:10:41+5:30
अल्पसंख्यांक समुदायाच्या कल्याणकारी योजना प्रभाविपणे कार्यान्वित कराव्या या मागणीसाठी मुव्हमेंट फॉर पीस अॅड. जस्टिज फॉर वेलफेअर (एमपीजे) या संघटनेने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

उमरखेड एसडीओंना ‘एमपीजे’चे निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : अल्पसंख्यांक समुदायाच्या कल्याणकारी योजना प्रभाविपणे कार्यान्वित कराव्या या मागणीसाठी मुव्हमेंट फॉर पीस अॅड. जस्टिज फॉर वेलफेअर (एमपीजे) या संघटनेने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
सच्चर समितीच्या शिफारसी पुर्णत: लागू करणे, मुंबई उच्च न्यायालयाच्या शिफारसीनुसार शैक्षणिक क्षेत्रात मुस्लीम समुदायाच्या आरक्षणासाठी आवश्यक पाऊले उचलावी या व इतर मागाण्यांसाठी निवेदन देण्यात आले. यावेळी एमपीजेचे अध्यक्ष मोहसिन खान, कार्याध्यक्ष डॉ. फारूक अबरार, जहीर हमीद, सरफराज अहेमद, समीर मुस्तफा, तौफीक रफीक, कलीम रजा, मुख्तार शहा, मुब्बशीर आदी उपस्थित होते.