वेतनासाठी हिवताप कर्मचाºयांचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 23:13 IST2017-08-29T23:11:12+5:302017-08-29T23:13:05+5:30

वेतनातील अनियमिततेमुळे हिवताप कर्मचाºयांची आर्थिक कोंडी झाली आहे. याशिवाय इतर प्रश्नही निर्माण झाले आहेत. यासंदर्भात जिल्हा हिवताप अधिकाºयांना निवेदन देण्यात आले आहे.

 Request for malaria workers for wages | वेतनासाठी हिवताप कर्मचाºयांचे निवेदन

वेतनासाठी हिवताप कर्मचाºयांचे निवेदन

ठळक मुद्देवेतनातील अनियमिततेमुळे हिवताप कर्मचाºयांची आर्थिक कोंडी झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वेतनातील अनियमिततेमुळे हिवताप कर्मचाºयांची आर्थिक कोंडी झाली आहे. याशिवाय इतर प्रश्नही निर्माण झाले आहेत. यासंदर्भात जिल्हा हिवताप अधिकाºयांना निवेदन देण्यात आले आहे.
वेतन अनियमित आणि विलंबाने होत असल्याने गृहकर्जाचे हप्ते, पाल्याचे शैक्षणिक शुल्क, वैद्यकीय उपचार, कार्यक्षेत्रात दौरे आदी बाबींवर परिणाम होत आहे. काळजीपूर्वक तपासणी व शहानिशा न करता वेतनपट कोषागार कार्यालयाला सादर होत असल्याने वेगवेगळ्या त्रुट्या काढल्या जात आहे. वेतनपट परत पाठविण्यात येत असल्याने गेली अनेक महिन्यांपासून वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आर्थिक भुर्दंड व मानसिक त्रास या कर्मचाºयांना सहन करावा लागतो.
वेतन महिन्याच्या ५ तारखेच्या आत आणि नियमित व्हावे यासाठी हिवताप कर्मचारी संघटनेने निवेदन दिले. अचानक बंद करण्यात आलेला प्रवासभत्ता सुरू करावा, बंद केलेला आदिवासी भत्ता चालू महिन्यापासून लागू करण्यात यावा, सेवा पुस्तके अद्यावत करावी, सेवानिवृत्त कर्मचाºयांचा बांधाबांध भत्ता, बदली झालेल्या कर्मचाºयांचा बदली प्रवास भत्ता, अनुदान उपलब्ध करून घेत प्राधान्याने काढण्यात यावा, १२ व २४ वर्षे सेवा झालेल्या कर्मचाºयांच्या कालबद्ध पदोन्नतीचे प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करावे आदी मागण्या करण्यात आल्या. सदर प्रश्न निकाली न निघाल्यास आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी संघटनेचे सुभाष वानरे, प्रकाश मुडाणकर, आशीष देशमुख, मोहन दहेकर, नितीन हंडे, के.व्ही. कुळकर्णी आदी उपस्थित होते.

Web Title:  Request for malaria workers for wages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.