वडार समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 21:26 IST2018-01-07T21:26:09+5:302018-01-07T21:26:26+5:30

वडार समाजातील एका अल्पवयीन तरुणीवर अतिप्रसंग करून तिची हत्या करण्याची घटना लातूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे घडली. या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य वडार समाज संघाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

Representation to District Collector of Wadar Community | वडार समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

वडार समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वडार समाजातील एका अल्पवयीन तरुणीवर अतिप्रसंग करून तिची हत्या करण्याची घटना लातूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे घडली. या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य वडार समाज संघाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
टेंभुर्णी येथील सदर तरुणीवर अतिप्रसंग करून हत्या करण्यात आली. परंतु आजही आरोपी मोकाट आहे. उलट राजकीय दबावातून प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप निवेदनातून करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करावी, अन्यथा जिल्ह्यात वडार समाजाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला. सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांना देण्यात आले.
यावेळी वडार समाजाचे जिल्हाध्यक्ष विलास पवार, सामाजिक कार्यकर्ता अरुण देवकर, मनोज आडे, रमेश जगताप, सुरज बंडीवार, सतीश पाटील, तुषार बेतवार, विठ्ठलराव धानोरकर यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Representation to District Collector of Wadar Community