बौद्ध महासभेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By Admin | Updated: May 13, 2017 00:27 IST2017-05-13T00:27:23+5:302017-05-13T00:27:23+5:30
शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून त्यांच्या मुला-मुलींना प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मोफत देण्यात यावे,

बौद्ध महासभेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून त्यांच्या मुला-मुलींना प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मोफत देण्यात यावे, यासह विविध मागण्यांचे निवेदन दि बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडियातर्फे (भारतीय बौद्ध महासभा) जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
तत्पूर्वी येथील बसस्थानक चौकात भारतीय बौद्ध महासभेचा स्थापना दिन साजरा करण्यात आला. जिल्हाध्यक्ष धर्मपाल माने अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिवराव भालेराव, सुखदेवराव जाधव, रामदास बनकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समयोचित विचार मांडले. यावेळी आनंद भगत, यांच्यावर पर्यटन विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली. संचालन महादेवराव अढावे यांनी, तर तालुका अध्यक्ष काशीनाथ ब्राह्मणे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला गोविंद मेश्राम, करुणा शिरसाट, महादेवराव अढावे, भीमराव काळपांडे, सदाशिवराव भालेराव, देवानंद शेळके, आनंद भगत, डी.के. हनवते, गुलाबराव रामटेके, हरिदास मेश्राम, सुरेश मेश्राम, रवींद्र श्रीरामे, कैलास गोंडाणे, चंद्रकांत अलोणे, प्रकाश तायडे, संगीता चंदनखेडे, रत्नपाल डोफे, अॅड. प्रशांत इंगोले, रमेश नाखले, नामदेवराव थूल आदी उपस्थित होते.