पत्रकारांवर हल्लाप्रकरणी गृहराज्यमंत्र्यांना निवेदन
By Admin | Updated: July 11, 2015 00:12 IST2015-07-11T00:12:59+5:302015-07-11T00:12:59+5:30
पत्रकारांवर हल्ल्याच्या घटना दिवसागणिक वाढत आहे. हा प्रकार पत्रकारांची मुस्कटदाबी करणारा आहे.

पत्रकारांवर हल्लाप्रकरणी गृहराज्यमंत्र्यांना निवेदन
नेर : पत्रकारांवर हल्ल्याच्या घटना दिवसागणिक वाढत आहे. हा प्रकार पत्रकारांची मुस्कटदाबी करणारा आहे. पत्रकारांना संरक्षणासोबतच हल्लेखोरांवर कठोर कारवाईसाठी कायदा करावा, अशी मागणी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांना दिलेल्या निवेदनातून राष्ट्रीय मराठी पत्रकार संघाने केली आहे.
कुठल्याही प्रकरणात पत्रकारांनी लेखणी चालविल्यास त्यांच्यावर हल्ला केला जातो. पोलिसांकडूनही हल्लेखोरांना पाठबळ दिले जाते. काही अवैध व्यावसायिक आणि पुढाऱ्यांनी पत्रकारांची मुस्कटदाबी सुरू केल्याचे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी राष्ट्रीय पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष गजानन काळे, कार्याध्यक्ष अरुण राऊत, सचिव किशोर वंजारी, उपाध्यक्ष अशोक इसाळकर, कोषाध्यक्ष संजय राऊत, जिल्हा प्रतिनिधी प्रा. सदाशिव नरोटे, संघटक नदीम खान, प्रसिद्धी प्रमुख प्रवीण पाटमासे, सदस्य बिस्मील्ला खान, विनोद कापसे, योगेश दहेकर, तालुका पत्रकार संघाचे गणेश राऊत, संकेत सदावर्ते आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)