शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

पायल तडवी आत्महत्याप्रकरणी अ‍ॅट्रॉसिटी नोंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 21:42 IST

अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्याने होत असलेल्या छळाला कंटाळून डॉ. पायल तडवी यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी तीन महिला डॉक्टरांवर गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट अंतर्गत कारवाई झाली नाही. ही कारवाई करावी तसेच रुग्णालयाच्या प्रबंधन समितीवर कारवाई व्हावी, असे निवेदन विविध संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : प्रबंधन समितीवरही कारवाईची विविध संघटनांकडून मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्याने होत असलेल्या छळाला कंटाळून डॉ. पायल तडवी यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी तीन महिला डॉक्टरांवर गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट अंतर्गत कारवाई झाली नाही. ही कारवाई करावी तसेच रुग्णालयाच्या प्रबंधन समितीवर कारवाई व्हावी, असे निवेदन विविध संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.मुंबईतील बीवायईएल नायर हॉस्पिटलमध्ये स्नातकोत्तर शिक्षण घेत असलेल्या पायल तडवी हिने आत्महत्या केली. जातीवाचक टिप्पणी करून होत असलेल्या मानसिक छळामुळे तिने आत्महत्या केली. प्रकरणी डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहर व डॉ. अंकिता खंडेलवाल यांच्याविरूद्ध भादंवि कलम ३०६ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई झाली नाही. प्रबंधक कमिटीनेही डॉ. तडवी यांनी केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. या प्रबंध प्रमुखावरही गुन्हा नोंदवावा, असे निवेदनात नमूद केले आहे.सदर प्रकरणी तत्काळ कारवाई व्हावी तसेच डॉ. पायल तडवीच्या कुटुंबाला तत्काळ आर्थिक मदत करून अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात नमूद रोख रक्कमही द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर यवतमाळ नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष आनंद गायकवाड, नवनीत महाजन, संजय बोरकर, पद्माकर घायवान, भीमसिंह चव्हाण, गोविंद मेश्राम, अ‍ॅड. जयसिंह चव्हाण, अशोक वाकोडे, अरविंद खोब्रागडे, मंगला जाधव, सुनील पुनवटकर, अशोक शेंडे, राजेश जुनगरे, संतोष कांबळे, डॉ. मिलिंद साबळे, चंद्रबोधी घायवटे, अशोक इंगोले, अशोक ताकसांडे, अ‍ॅड. धनंजय मानकर, अ‍ॅड. प्रवीण धुळधुळे, सिद्धार्थ भवरे, राजेंद्र कांबळे आदींच्या स्वाक्षºया आहेत.