मार्की आश्रमशाळेची प्रतिकृती राज्यात अव्वल

By Admin | Updated: February 29, 2016 02:12 IST2016-02-29T02:12:10+5:302016-02-29T02:12:10+5:30

विद्याप्रतिष्ठान बारामती येथे पार झालेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासीबहुल झरी ...

A replica of the Marquee Ashramshala is the top in the state | मार्की आश्रमशाळेची प्रतिकृती राज्यात अव्वल

मार्की आश्रमशाळेची प्रतिकृती राज्यात अव्वल

मुकुटबन : विद्याप्रतिष्ठान बारामती येथे पार झालेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासीबहुल झरी तालुक्यातील मार्की (बु.) येथील आश्रमशाळेची प्रतिकृती राज्यात अव्वल ठरली आहे.
अविनाश परशुराम मडावी या विद्यार्थ्याने पी.डी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सौर कंदीलद्वारा चालणारे धान्य स्वच्छता यंत्र’ ही प्रतिकृती प्रदर्शनात ठेवली होती. तिला आदिवासी प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक मिळाला. या प्रतिकृतीची आता राष्ट्रीय स्तरासाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे पी.डी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तर, राज्यस्तर व तिनदा राष्ट्रीय स्तरावर प्रतिकृती सादर केल्या आहे.
या यशाबद्दल झरी येथील पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे पी.डी. पाटील यांचा शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या यशाबद्दल संस्था सचिव मधुकर एकुर्केकर, विशाल एकुर्केकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, यांनी कौतुक केले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: A replica of the Marquee Ashramshala is the top in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.