आॅनलाईन संच मान्यतेतील त्रुटी दूर

By Admin | Updated: August 8, 2015 02:40 IST2015-08-08T02:40:51+5:302015-08-08T02:40:51+5:30

शासनाच्या शिक्षण विभागातर्फे २०१४-१५ पासून सुरू करण्यात आलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या आॅनलाईन संच मान्यतेच्या सॉफ्टवेअरमध्ये अनेक त्रुट्या व दोष होते.

Removal of errors in the online set | आॅनलाईन संच मान्यतेतील त्रुटी दूर

आॅनलाईन संच मान्यतेतील त्रुटी दूर

पुसद : शासनाच्या शिक्षण विभागातर्फे २०१४-१५ पासून सुरू करण्यात आलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या आॅनलाईन संच मान्यतेच्या सॉफ्टवेअरमध्ये अनेक त्रुट्या व दोष होते. त्यामुळे राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका निर्माण झाला होता. याबाबत विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशनने पुढाकार घेतला होता. त्यावरून आता या सॉफ्टवेअरमधील दोष दूर करण्याचे निर्देश प्रधान सचिव नंदकुमार यांनी दिले आहे.
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या निर्देशानुसार मुंबई येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीला महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा.डी.बी. जांभरुनकर, महासचिव प्रा. अनिल देशमुख, विज्युक्टाचे प्रांताध्यक्ष डॉ. अविनाश बोरडे, महासचिव प्रा. अशोक गव्हाणकर, प्रा. राजेंद्र पाखरे उपस्थित होते. या बैठकीत विभागवार विद्यार्थी संख्येचे प्रचलित निकष लक्षात घेणे, दोन किंवा जास्त विषयांच्या कार्यभाराची गनणा करणे, माध्यम तुकडीनिहाय विद्यार्थी संख्येवर कार्यभाराची गनणा करणे, वैकल्पिक विषयांमध्ये अल्पसंख्यक विद्यार्थ्याला १० व इतर विषयाला २० विद्यार्थी ग्राह्य धरणे, प्रात्यक्षिक असलेल्या विषयाच्या कार्यभाराची संच मान्यतेत गनणा करणे आदी बाबींना मान्यता देण्यात आली आहे. यामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Removal of errors in the online set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.