कर्जमाफी अर्जाला ‘मंत्रा’चा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 22:44 IST2017-08-28T22:44:00+5:302017-08-28T22:44:29+5:30

कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरताना लाख प्रयत्न केल्यानंतरही सॉफ्टवेअर पुढे सरकत नाही.

Remission of Mantra to loan application | कर्जमाफी अर्जाला ‘मंत्रा’चा उतारा

कर्जमाफी अर्जाला ‘मंत्रा’चा उतारा

ठळक मुद्देतंत्रज्ञांनी हात टेकले : १५ दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतांश सेतू केंद्र ठप्प

रूपेश उत्तरवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरताना लाख प्रयत्न केल्यानंतरही सॉफ्टवेअर पुढे सरकत नाही. यावर मात करण्यासाठी मंत्रा नावाचे नवे सॉफ्टवेअर जिल्ह्यात पाठविण्यात आले आहे. यामुळे संकेतस्थळाची गती वाढेल, असा प्रशासनाचा दावा आहे.
जिल्ह्यातील दोन लाख ८० हजार शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले आहेत. या सर्वच शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. त्याकरिता सेतू केंद्र, सीएससी सेंटर आणि ई महासेवा केंद्रावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शेतकºयांना तेथे आपले दस्तावेज सादर करावे लागतात. मात्र, या केंद्रावर शेतकरी पोहोचल्यावर सॉफ्टवेअर अर्जच स्वीकारत नाही.
जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांच्या आधारकार्डला मोबाईल क्रमांक लिंक नाही. यामुळे आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकºयांचा थम्ब घेतला जातो. आपले सरकार केंद्रावर हे थम्ब अ‍ॅक्टिव्ह होत नाही. केंद्रावर लाख चकरा मारल्यानंतरही सॉफ्टवेअर पुढे सरकत नाही. परिणामी शनिवारपर्यंत २३ हजारच अर्ज भरले गेले. ज्यांचे आधारकार्ड मोबाईलशी ‘कनेक्ट’ आहे, अशाच शेतकºयांचा यामध्ये समावेश आहे. मात्र आधार लिंक नसल्याने या शेतकºयांना थम्बशिवाय पर्याय नाही. थम्ब अ‍ॅक्टिव् होत नाही. यामुळे लाखो अर्ज पेंडीग पडले आहेत.
पती, पत्नी आणि मुलाची हजेरी
कर्जमाफी अर्ज भरताना संपूर्ण परिवाराचे आधार आणि थम्ब घेतले जात आहे. यातील एखादा सदस्य हजर नसला तरी अर्ज पुढे सरकत नाही. त्यात लिंक नसल्याने शेतकरी वैतागले आहेत.
२०० मंत्रा थम्ब मशीन उपलब्ध
आपले सरकार पोर्टलवरील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी मंत्रा स्वाफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. अशा २०० थम्ब मशिन जिल्ह्याकडे वळत्या करण्यात आल्या आहेत. हे थम्ब मशिन लावताच अर्ज भरले जातील, हा जिल्हा प्रशासनाचा दावा किती खरा ठरतो, हे प्रत्यक्ष अंमलबजावणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
तज्ज्ञ शोधताहेत अडचणी
जिल्ह्यातील लिंक फेलचे कारण शोधण्यासाठी तज्ज्ञांची चमू तयार करण्यात आली. ही चमू मंत्रा नावाचे थम्ब मशिन वाटप करण्यासोबतच काय अडचणी येत आहेत, हेही जाणून घेत आहे.

Web Title: Remission of Mantra to loan application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.