रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 23:17 IST2017-09-05T23:16:58+5:302017-09-05T23:17:17+5:30
रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लागणार असल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर हे म्हणाले. आर्णी येथील पक्ष कार्यकर्ता मेळावाप्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करीत होते.

रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लागणार
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लागणार असल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर हे म्हणाले. आर्णी येथील पक्ष कार्यकर्ता मेळावाप्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करीत होते.
नितीन गडकरी यांच्याकडे आता सिंचन विभाग आल्यामुळे महाराष्ट्रात सिंचनाचे प्रमाण निश्चितच वाढणार आहे. गडकरींनी ज्या पद्धतीने रोडचे जाळे विणले आहे. त्याच धर्तीवर रखडलेले सिंचनाचे मोठे प्रकल्प आता मार्गी लागणार आहेत. यामध्ये आपल्या जिल्ह्यातील चिमटा येथील पैनगंगा प्रकल्पसुद्धा आता होणार आहे. यामुळे राज्यातील शेतकरी वर्गाचे उत्पन्न निश्चितच वाढणार असल्याचे केंद्रीय मंत्री म्हणाले. यावेळी विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांसह शहरातील प्रतिष्ठीत डॉक्टरमंडळीने सुद्धा भाजपात प्रवेश घेतला. यामध्ये काँग्रेस, मनसे, शिवसेना या पक्षातील अनेक लोकांनी भाजपात प्रवेश घेतला.
या कार्यक्रमाला यावेळी आमदार राजू तोडसाम, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निलय नाईक, उद्धवराव येरमे, जिल्हा परीषद सदस्य प्रकाश राठोड, पंचायत समिती उपसभापती पपीता भाकरे, प्रियतमा बन्सोड, नुनेश्वर आडे विपीन राठोड, प्रा. विनीत माहुरे, बाळासाहेब चावरे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.