तिवरंग येथील कुटुंबांचे पुनर्वसन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:42 IST2021-08-15T04:42:09+5:302021-08-15T04:42:09+5:30
यांनी केली आहे. तिवरंग येथील नाल्याच्या पाण्यामुळे गावातील घरांचे वारंवार नुकसान होत आहे. पुरामुळे प्रचंड हानी झाली आहे. गेल्या ...

तिवरंग येथील कुटुंबांचे पुनर्वसन करा
यांनी केली आहे.
तिवरंग येथील नाल्याच्या पाण्यामुळे गावातील घरांचे वारंवार नुकसान होत आहे. पुरामुळे प्रचंड हानी झाली आहे. गेल्या २० वर्षांपासून गावकऱ्यांची पुनर्वसनाची मागणी अद्यापही पूर्ण झाली नाही. शासनाने त्वरित दखल घेऊन पुनर्वसन करावे, अशी मागणी सरपंच जयश्री राठोड यांनी पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तिवरंग गावाला नाल्याचा संपूर्ण वेढा पडलेला आहे. अति पावसामुळे अनेकदा घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांच्या मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक जनावरे मृत्युमुखी पडलेली आहे. दरवर्षी पूर हानीमुळे प्रचंड नुकसान सोसावे लागत आहे. गावात शासकीय जमीन उपलब्ध असून पुनर्वसन होत नाही. याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. नागरिकांची भावना लक्षात घेता तत्काळ पुनर्वसन करण्याची मागणी सरपंच राठोड यांनी केली.