विदर्भ विकासातूनच प्रादेशिक समतोल
By Admin | Updated: February 13, 2016 02:23 IST2016-02-13T02:23:33+5:302016-02-13T02:23:33+5:30
वैदर्भीय तरुणांनी आपली भाषा, संस्कृती यांचा अभिमान बाळगावा. महाराष्ट्राच्या प्रादेशिक असमतोलावर विदर्भ विकास हाच उपाय आहे,...

विदर्भ विकासातूनच प्रादेशिक समतोल
विनायक देशपांडे : आर्णी येथे ‘प्रादेशिक असमतोला’वर परिसंवाद
आर्णी : वैदर्भीय तरुणांनी आपली भाषा, संस्कृती यांचा अभिमान बाळगावा. महाराष्ट्राच्या प्रादेशिक असमतोलावर विदर्भ विकास हाच उपाय आहे, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू व व्यावसायिक व्यवस्थापनाचे विभाग प्रमुख डॉ. विनायक देशपांडे यांनी केले.
आर्णी येथे ‘महाराष्ट्राचा प्रादेशिक असमतोल’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. श्री म.द. भारती महाविद्यालयातर्फे हा परिसंवाद झाला. यावेळी दत्त प्रसादिक शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष प्रियदर्शन भारती अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे प्राचार्य जी.एम. अग्रवाल, प्रा.विनीत माहुरे होते.
बीज भाषणात देशपांडे यांनी भाषेच्या आधारावर फजल समितीने केलेली प्रांत रचना, विदर्भाचा अनुशेष, विदर्भातील तरुणांचे स्थलांतर आदी मुद्यांचा ऊहापोह केला. यावेळी डॉ. संजय भारती यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले. प्रा.शशिकांत वानखडे, प्रा.एम.जी. वाकडे, प्रा.आर.एफ. राठोड, प्रा.खोब्रागडे, प्रा.यू.डी. चव्हाण, प्रा.एम.आर. काकपुरे, प्रा.पी.जे. आवटे, प्रा.पी.आर. भोकरे उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.निवृत्ती पिस्तुलकर तर सूत्रसंचालन सुरेखा उबाळे यांनी केले. आभार गणेश जाधव यांनी मानले. अर्थशास्त्र मंडळाचे अध्यक्ष प्रशांत कदम, सुषमा वाघमारे, उमेश मानकर, दीपाली राठोड, दीप्ती जाधव, सुयोग चिंतावार, अनिल पिल्लेवार यांनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)