मजूर सोसायट्या नियमांच्या कचाट्यात

By Admin | Updated: July 27, 2014 23:57 IST2014-07-27T23:57:42+5:302014-07-27T23:57:42+5:30

मजूर कामगार सहकारी सोसायटीच्या नावावर अनेकांनी आपली दुकानदारी थाटल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. प्रत्यक्ष मजूर काम करते की, नाही याची पडताळणी करण्यासाठी उच्च

Regarding labor society rules | मजूर सोसायट्या नियमांच्या कचाट्यात

मजूर सोसायट्या नियमांच्या कचाट्यात

निकषांची प्रतिपूर्ती नाही : केवळ पाच सोसायट्यांचा अहवाल
यवतमाळ : मजूर कामगार सहकारी सोसायटीच्या नावावर अनेकांनी आपली दुकानदारी थाटल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. प्रत्यक्ष मजूर काम करते की, नाही याची पडताळणी करण्यासाठी उच्च न्यायालयाने निकष ठरवून दिले आहे. याच निकषाची प्रतिपूर्ती करण्यात आल्याचे प्रमाणपत्र सहकार उपनिबंधकानी मागितले आहे. त्यामुळे अनेक सोसायट्यांचे पितळ उघडे पडणार आहे.
जिल्ह्यात एकूण १२९ मजूर कामगार सहकारी सोसायट्या कार्यरत आहे. चार निकषांची पूर्तता करणाऱ्याच संस्थेला काम देण्याचे स्पष्ट निर्देश सहकार विभागाकडून देण्यात आले आहे. वर्षाअखेर या निकषाची पडताळणी केली जाते. याबाबतचा तपासणी अहवाल तालुका सहायक निबंधकांकडूनच मागविण्यात आला आहे. प्रत्यक्षात तीन महिन्याचा कालावधी लोटूनही केवळ पाच मजूर कामगार सहकारी संस्थांनी निकष पूर्ण केल्याचा अहवाल सादर केला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पाटबंधारे विभागात सोसायट्यासाठी आरक्षित कामाचे अजूनही वाटप झाले नाही. केवळ जिल्हा परिषदेतच मजूर कामगार सोसायट्यांचे लांगुनचालन सुरू आहे.
मजूर कामगार सोसायट्यामध्ये अफरातफर झाल्याच्या अनेक तक्रारी आहेत. शहरातील काम वाटपात गैरप्रकार झाल्याची तक्रार यवतमाळ नगरपरिषदेतील नगरसेवकांनी जिल्हा सह निबंधकाकडे केली होती. त्यावरूनच प्रत्येक मजूर कामगार सहकारी सोसायटीची पडताळणी करण्यात आली. ही बाब गंभीरपणे घेण्यात आली असून तालुकास्तरावरही कसून तपासणी केली जात आहे. मजूर कामगार सहकारी सोसायटीचेच मजूर प्रत्यक्ष कामावर राहतात की नाही, याची पडताळणी करण्यासाठी हे निकष ठरविण्यात आले आहे.
मजूर कामगार सहकारी सोसायटीतील जो सभासद प्रत्यक्ष काम करत नाही, त्यांना काढून टाकण्यात यावे, मजूर सभासदांना ओळखपत्र देण्यात यावे, सर्व सभासंदाची बँक खाती उघडून त्यांना धनादेशाद्वारेच मजुरी द्यावी, याचा अहवाल संबंधित बँकांकडून दर आठवड्याला तालुका सहायक निबंधकाने मागवावा, सर्व सभासदाचा अपघात विमा काढलेला असावा तसेच मजूर सहकारी सोसायटीला २० आक्टोबर १९८६ च्या आदेशापूर्वी अस्तित्वात असलेल्या सर्व सवलती चालू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Regarding labor society rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.