शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
2
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
3
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
4
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
5
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
6
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
7
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
8
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
9
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
10
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
11
लेख: माणूस १०० वर्षांपलीकडे आपले आयुष्य वाढवू शकतो का?
12
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
13
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
14
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
15
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
16
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
17
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
18
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
19
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
20
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना

भरती झाली, पण नियुक्त्या नाहीत ; २,४८८ पात्र उमेदवार अद्याप प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 16:46 IST

Yavatmal : निकाल घोषित होऊनही २,४८८ पदांवर नियुक्ती नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पेसा क्षेत्रात १७ संवर्गातील पदे भरण्यासाठी शासनाने भरती प्रक्रिया राबवली होती. यात ७ ते ८ संवर्गातीलच पदे शासनाने भरली. इतर संवर्गातील सहा हजार ९३१ पदे आजपर्यंत भरली नाहीत. दोन हजार ४८८ पदांचा निकाल घोषित आहे. तर तीन हजार ६९३ पदांचा निकाल तयार असला तरी तो राखून ठेवला आहे. यामुळे आदिवासींवर अन्याय होत आहे.

शासनाने पेसा क्षेत्रात तलाठी ५७४, ग्रामसेवक ४२२, अंगणवाडी पर्यवेक्षक ५७, शिक्षक एक हजार ५४४, कृषी सहायक ३६५, पशुधन पर्यवेक्षक १२९, परिचारिका एक हजार ३८४, आरोग्यसेवक ग्रामविकास विभाग ५८३, सार्वजनिक आरोग्य विभाग २४१, वनरक्षक ८८२, कोतवाल ८४ आणि पोलिस पाटलांच्या ६६६ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली होती. त्यानंतर निकाल घोषित करण्यात आला; परंतु तलाठी ५७४, शिक्षक एक हजार ५४४, पशुधन पर्यवेक्षक १२९, आरोग्य सेवक सार्वजनिक आरोग्य विभाग २४१ अशा दोन हजार ४८८ पात्र उमेदवारांना नियुक्ती दिली नाही. तीन हजार ६९३ पदसंख्येचा निकालही तयार आहे; मात्र आजपर्यंत तो घोषित केला नाही. त्यामुळे ४२२ ग्रामसेवक, ३६५ कृषी सहायक, एक हजार ३८४ परिचारिका, ५८३ आरोग्यसेवक ग्रामविकास तर ८८२ वनरक्षक पदाच्या नोकरीपासून आदिवासींना वंचित राहावे लागत आहे. 

सचिवांनी घेतली बैठक

  • पेसा क्षेत्रातील पदभरतीचा विषय विधानसभेतही गाजला. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांनी राज्यातील सर्व सहायक आयुक्तांची ९ जुलै रोजी व्हीसी घेतली.
  • यात मागासवर्ग कक्षामार्फत किती संवर्गातील बिंदू नामावली तपासली आणि आरक्षणानुसार पदभरतीची सद्यस्थिती याबाबतचा आढावा घेतला.
  • दरम्यान, शनिवारी यवतमाळात धरती आबा अभियान कार्यक्रमावेळी आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी महिनाभरात १०० टक्के पदे भरणार असल्याचे सांगितले.
टॅग्स :Yavatmalयवतमाळ