इंडसईड बँकेच्या वसुली कर्मचाऱ्यांनी घातला साडेदहा लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 05:00 IST2022-04-20T05:00:00+5:302022-04-20T05:00:23+5:30

आशीषने दोघांना पैशांची मागणी केली. नंतरच पावती तयार करतो, असे सांगितले. यावरून चिडलेल्या दोघांनी आशीषवर हल्ला केला. त्याला सर्जिकल ब्लेडचा धाक दाखवून त्याच्याजवळील बँकेची रोख पावती बनविण्याची मशीन, प्रिंटर व १८ हजार ६३० रुपये रोख असलेली बॅग हिसकावून नेली. याप्रकरणी बँक व्यवस्थापक राजेश आस्वले यांनी दोघांविरोधात तक्रार दिली.

Recovery employees of Induside Bank embezzled Rs 1.5 lakh | इंडसईड बँकेच्या वसुली कर्मचाऱ्यांनी घातला साडेदहा लाखांचा गंडा

इंडसईड बँकेच्या वसुली कर्मचाऱ्यांनी घातला साडेदहा लाखांचा गंडा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील दारव्हा मार्गावर इंडसईड बँकेची शाखा आहे. या बँकेकडून वाहनांसाठी कर्ज दिले जाते. तेथील कलेक्शन एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करणाऱ्या दोघांनी वसूल केलेला पैसा बँकेत जमाच केला नाही. जवळपास साडेदहा लाख रुपयांचा अपहार केला. हे प्रकरण माहीत झाल्यानंतर सावरासावर करण्यासाठी बँकेतीलच  सहकाऱ्याला मारहाण करून जबरदस्ती पावत्या बनवायला सांगितल्या. त्याने नकार देताच बँकेच्या कलेक्शन मशीनसह प्रिंटर घेऊन दोघेही पसार झाले. 
चेतन विठ्ठलराव ठाकरे (३२), अमोल राजू विलायतकर (३२) दोघेही रा.चमेडियानगर, यवतमाळ असे गुन्हा दाखल झालेल्या वसुली कर्मचाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात  ग्राहकांच्या तक्रारी सातत्याने सुरू होत्या. या तक्रारींची चौकशी केली असता साडेदहा लाख रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले. त्यामुळे १३ एप्रिल रोजी चेतन ठाकरे याने वसुली कर्मचारी आशीष बगमारे याला ग्राहकाचे पैसे घेऊन रिसिट बनवायची आहे. असे सांगत बसस्थानकावर बोलावले. त्या वेळी चेतनसोबत अमोल विलायतकर उपस्थित होता. आशीषने दोघांना पैशांची मागणी केली. नंतरच पावती तयार करतो, असे सांगितले. यावरून चिडलेल्या दोघांनी आशीषवर हल्ला केला. त्याला सर्जिकल ब्लेडचा धाक दाखवून त्याच्याजवळील बँकेची रोख पावती बनविण्याची मशीन, प्रिंटर व १८ हजार ६३० रुपये रोख असलेली बॅग हिसकावून नेली. याप्रकरणी बँक व्यवस्थापक राजेश आस्वले यांनी दोघांविरोधात तक्रार दिली. त्यावरून अवधूतवाडी पोलिसांनी सोमवारी रात्री कलम ४०६, ४०८, ४२०, ३९४, ४६७, ४६८, ४७१, ५०४, ५०६ व ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला.

बँक व्यवस्थापकांनी दिली होती तोंडी समज
दोन्ही आरोपी अनुक्रमे मागील पाच व तीन वर्षांपासून इंडसईड बँकेच्या दारव्हा रोड शाखेत कार्यरत आहे. शाखा अधिकारी आकाश तिवारी याला या दोघांच्या व्यवहारावर फेब्रुवारी महिन्यात संशय आला होता. त्यांनी ग्राहकांकडे वसूल केलेले एक लाख रुपये भरलेच नाही. हा प्रकार व्यवस्थापक राजेश आस्वले यांना सांगण्यात आला. त्या वेळी दोघांनाही बोलावून समज देण्यात आली. मात्र, त्यांनी आपल्या वर्तनात सुधारणा केली नाही. अखेर ग्राहकांना साडेदहा लाखांचा गंडा घातल्याचे हे प्रकरण पुढे आले. त्यानंतर मात्र बँक प्रशासनाने थेट पोलिसात धाव घेतल्याने दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले. 

 

Web Title: Recovery employees of Induside Bank embezzled Rs 1.5 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.