भूमी अभिलेखच्या फेरफार नोंदी थांबल्या
By Admin | Updated: August 16, 2014 23:44 IST2014-08-16T23:44:42+5:302014-08-16T23:44:42+5:30
महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेने विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमदुत संप पुकारला आहे. यामुळे भूमी अभिलेखाच्या फेरफार नोंदीच थांबल्या आहे. जिल्ह्यातील ३५० कर्मचारी

भूमी अभिलेखच्या फेरफार नोंदी थांबल्या
आंदोलन : ३५० कर्मचारी संपावर, नागरिकांची तारांबळ
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेने विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमदुत संप पुकारला आहे. यामुळे भूमी अभिलेखाच्या फेरफार नोंदीच थांबल्या आहे. जिल्ह्यातील ३५० कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत.
भूमी अभिलेख खाते तांत्रिक खाते म्हणून घोषित करण्यात यावे, विभागातील सर्व कामे तांत्रिक स्वरूपाची असल्याने कर्मचाऱ्यांना तांत्रिक वेतनश्रेणी लागू करावी, राज्यात नगर भूमापन कार्यालय निर्माण करण्यात यावे, खासगीकरणाची अधिसूचना रद्द करावी, वर्ग २ च्या पदोन्नत्या कराव्या, विमा संरक्षण देण्यात यावे, कर्मचाऱ्यांना लॅपटॉप पुरविण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी या राज्यव्यापी आंदोलनात सहभाग नोंदविला आहे. भूमी अभिलेख कार्यालयाच्या माध्यमातून मालमत्तेसंदर्भातील महत्त्वपूर्ण नोंदी घेतल्या जात आहे. मात्र त्यासाठी काम करणारी यंत्रणा अडचणीत आहे. त्यामुळेच आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आंदोलनात महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संयुक्त संघटना आणि विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी आणि सदस्य सहभागी झाले आहेत. राज्य अध्यक्ष श्रीराम खिरेकर यांच्या नेतृत्वात आदोंलन सुरू करण्यात आले आहे. केंद्रीय सरचिटणीस अविनाश दशरथकर, केंद्रीय महिला उपाध्यक्ष अंजू बोपचे, जिल्हाध्यक्ष शरद चव्हाण, उपाध्यक्ष शशीकांत नवरे, महिला उपाध्यक्ष ए.जी. बोपचे, कार्याध्यक्ष शंकर थेटे, कोषाध्यक्ष वाय.पी. चव्हाण, संघटक सचिन उत्तरवार, प्रसिध्दी प्रमुख सचिन गुल्हाने, वर्ग ४ चे जिल्हा प्रतिनिधी जी.एन. काळे, सुभाष चव्हाण आदी सहभागी झाले आहेत. (शहर वार्ताहर)