सेवालाल महाराज व मुंगसाजी महाराज तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 22:50 IST2017-08-28T22:49:37+5:302017-08-28T22:50:00+5:30

पोहरादेवी येथील श्री संत सेवालाल महाराज, तसेच धामणगाव देव येथील श्री मुंगसाजी महाराज समाधीस्थळ ....

Recognition of Sevlal Maharaj and Munshaji Maharaj Pilgrimage Development Plan | सेवालाल महाराज व मुंगसाजी महाराज तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मान्यता

सेवालाल महाराज व मुंगसाजी महाराज तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मान्यता

ठळक मुद्देपोहरादेवी व धामणगाव देव : शिखर समितीची बैठक, विविध कामांसाठी निधी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पोहरादेवी येथील श्री संत सेवालाल महाराज, तसेच धामणगाव देव येथील श्री मुंगसाजी महाराज समाधीस्थळ या दोन तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने मान्यता दिली. या समितीची बैठक सोमवारी सह्याद्री राज्य अतिथीगृहात झाली. यावेळी विविध विभागाच्या मंत्र्यांसह महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचीही उपस्थिती होती.
श्री संत सेवालाल महाराज तीर्थक्षेत्र विकासासाठी २५ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. यामध्ये भक्त निवास बांधकाम दोन कोटी ५५ लाख ३८ हजार रुपये, संरक्षण भिंतीचे बांधकाम १ कोटी २ हजार रुपये, प्रदर्शन केंद्र १४ कोटी ६४ लाख ४२ हजार रुपये, अंतर्गत रस्त्याचे बांधकाम ९६ लाख ४९ हजार रुपये, सभामंडपाचे बांधकाम २ कोटी ४० लाख २ हजार रुपये, जमिनीचे सपाटीकरण, बगीचा व सौंदर्यीकरण ३ कोटी ४६ लाख ५० हजार रुपये इतक्या खर्चाच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. यापेक्षा अधिक लागणारा खर्च तीर्थक्षेत्र ट्रस्टने करावा असे बैठकीत ठरले.
श्री मुंगसाजी महाराज समाधीस्थळ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अनुषंगाने प्रथम टप्प्यात उच्चाधिकार व शिखर समितीने सहा कोटींचा निधी तातडीच्या कामांसाठी वितरीत केला होता. त्यानुसार त्यातील बहुतांश कामे पूर्ण झाली असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. तीर्थक्षेत्र आराखड्यासाठी २५ कोटी रुपयांच्या रकमेची मर्यादा असल्याने उर्वरित १९ कोटी ४७ लाख रुपये खर्चाचा आराखडा मान्यतेसाठी ठेवण्यात आला. त्यास शिखर समितीने मान्यता दिली. यामध्ये दर्शन बारीचे बांधकाम २० लाख रुपये, सामूहिक प्रसाधनगृहे ८२ लाख रुपये, सभामंडप ८० लाख रुपये, भोजन कक्ष बांधकाम एक कोटी ६१ लाख, बाल उद्यान व शेडसह इतर बांधकाम एक कोटी ७४ लाख, भक्त निवास (मुख्य मंदिर परिसर) तीन कोटी ५० लाख रुपये, भक्त निवास (चिंच मंदिर परिसर) ५० लाख रुपये, सी.सी.टी.व्ही. कॅमेरे व पोलीस चौकीचे बांधकाम २० लाख रुपये, धामणगाव (देव) येथे येणाºया पोच मार्गाचे बांधकाम एक कोटी ५० लाख रुपये, स्वागत कक्ष व लॉकर कार्यालय बांधकाम २५ लाख रुपये, आरोग्य सुविधा केंद्र व इतर सुविधांचे बांधकाम एक कोटी ७५ लाख रुपये, बस स्थानकाचे बांधकाम ३० लाख रुपये, संरक्षण भिंत ६० लाख रुपये, पाणीपुरवठा व्यवस्था तीन कोटी रुपये, विद्युत पुरवठा एक कोटी ५० लाख रुपये, तज्ज्ज्ञ सल्लागार खर्च ७३ लाख रुपये खर्चाच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली.

Web Title: Recognition of Sevlal Maharaj and Munshaji Maharaj Pilgrimage Development Plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.