निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज
By Admin | Updated: August 17, 2014 23:24 IST2014-08-17T23:24:57+5:302014-08-17T23:24:57+5:30
विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून निवडणूक विभागही यासाठी सज्ज झाले आहे. जिल्ह्यात मतदार नोंदणी मोहिमेंतर्गत सात मतदारसंघात ३४ हजार ७६१ नवीन मतदारांची नोंद

निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज
विधानसभा : ३४ हजार नवीन मतदार
यवतमाळ : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून निवडणूक विभागही यासाठी सज्ज झाले आहे. जिल्ह्यात मतदार नोंदणी मोहिमेंतर्गत सात मतदारसंघात ३४ हजार ७६१ नवीन मतदारांची नोंद झाली असून आता मतदारांची संख्या १९ लाख ७२ हजार २४९ झाली आहे. आणखी मतदार वाढण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. त्यामुळे प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यात वणी, आर्णी, राळेगाव, यवतमाळ, दिग्रस, पुसद आणि उमरखेड असे सात विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. मतदानासाठी छत्तीसगढवरून मतदान यंत्र बोलाविण्यात आले आहे. सात हजार मतदान यंत्र दाखल झाले आहे. मतदान यंत्रात मत नोंदविले जाते की नाही याची तपासणी करण्यात आली. स्थानिक महिला तंत्रनिकेतनमध्ये हैदराबादच्या अभियंत्यांनी या यंत्रांची तपासणी पूर्ण केली. सात विधानसभा क्षेत्रात १९ लाख ७२ हजार २४९ मतदार आहेत. दोन हजार ३१० मतदान केंद्राचे नियोजन प्रशासनाने केले आहे. निवडणुकीसाठी नऊ हजार ४२० कर्मचारी लागणार असून नऊ कोटी रुपयांचा निधीही यासाठी लागणार आहे. (शहर वार्ताहर)