रतनमुनींच्या दर्शनार्थ गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 21:33 IST2018-12-04T21:33:00+5:302018-12-04T21:33:11+5:30
येथील अग्रवाल ले-आऊटमधील धारसीभाई सेठ यांच्या निवासस्थानी विराजित छत्तीसगड प्रवर्तक गुरुदेव प.पू. रतनमुनीजी म.सा. यांचे ठिकठिकाणच्या भक्तांनी दर्शन घेतले.

रतनमुनींच्या दर्शनार्थ गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील अग्रवाल ले-आऊटमधील धारसीभाई सेठ यांच्या निवासस्थानी विराजित छत्तीसगड प्रवर्तक गुरुदेव प.पू. रतनमुनीजी म.सा. यांचे ठिकठिकाणच्या भक्तांनी दर्शन घेतले. नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, आर्णी, बाभूळगाव, नेर, कळंब, पांढरकवडा, राळेगाव आदी ठिकाणच्या जैन-जैनेत्तर बांधवांनी दर्शन व मांगलिकाचा लाभ घेतला.
येथील केशरिया भवनात चातुर्मासासाठी विराजित असलेले गुरुदेव प्रशमरती विजय म.सा. यांनी मंगळवारी गुरुदेव रतनमुनीजी म.सा. यांची भेट घेतली. धर्माविषयी चर्चा करून रतनमुनीजी म.सा. यांचे आशीर्वाद घेतले. यानंतर रतनमुनीजी म.सा. यांनी पोस्टल ग्राऊंड परिसरातील श्रीखंडे ले-आऊट जवळील महावीरजी सुराणा यांच्या निवासस्थानी प्रस्थान केले. नियमितपणे दुपारी १.३० ते २ या वेळात महामांगलिक व प्रवचनाचा लाभ प्रारंभ केला. त्यांच्या दर्शनार्थ भाविकांची गर्दी होत आहे. उपप्रवर्तक डॉ. सतीशमुनीजी म.सा. आदीठाणा ५ हेसुद्धा धारसीभाई सेठ यांच्या निवासस्थानी विराजित होते.