शाळा बंदच्या निर्णयावरून रणकंदन

By Admin | Updated: March 5, 2016 02:48 IST2016-03-05T02:48:33+5:302016-03-05T02:48:33+5:30

राज्य शासनाने विसपेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय म्हणजे कायद्याचा चुकीचा अर्थ काढून केलेली कारवाई आहे.

Rankandan from school closure decision | शाळा बंदच्या निर्णयावरून रणकंदन

शाळा बंदच्या निर्णयावरून रणकंदन

शिक्षक परिषद : जिल्हा कचेरीपुढे आज बेधडक आंदोेलन
यवतमाळ : राज्य शासनाने विसपेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय म्हणजे कायद्याचा चुकीचा अर्थ काढून केलेली कारवाई आहे. यातून गावातील शिक्षण थांबणार आहे. यामुळे सरकारच्या निर्णयाविरोधात शिक्षकांनी डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद संघटनेच्या नेतृत्वात बेधडक आंदोलन ५ मार्चला जिल्हा कचेरीसमोर करणार आहे. तर दुसरीकडे शाळा बंदच्या निर्णयाचा गावपातळीवर संताप पहायला मिळत आहे. यामुळे सरकारच्या निर्णयाविरोधात संघर्ष पेटण्याचे चिन्हे आहेत.
शाळा बंदच्या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य संकटात आले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ३१८ शाळांना याचा फटका बसणार आहे. साडेचार हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येणार आहे. मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार विद्यार्थ्यांना प्राप्त झाला आहे. मुळात शिक्षण हक्क कायद्यात नव्याने शाळा सुरू करण्यासाठी २० पटसंख्या आणि एक किलोमीटरची अट घालण्यात आली आहे. मात्र प्रशासनातील अधिकाऱ्यांनी याचा चुकीचा अर्थ काढून २० पटसंख्येच्या आतील शाळा बंद करण्याचे काम सुरू केले आहे. याविरोधात ५ मार्चला बेधडक जनआंदोलन छेडले जाणार आहे. शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात येणार आहे. संघटनेचे अध्यक्ष पप्पू पाटील भोयर, प्रदेशाध्यक्ष सतीश काळे, विदर्भ प्रांत प्रमुख कैलास राऊत, शेषराव येलेकर, अंबादास रेडे, विलास पाटील, सुनील मनवर, नरेन्द्र हाडके, राजकुमार भोयर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार आहे. यात शेकडो शिक्षक राहणार आहे. यामुळे शासन विरोधात शिक्षक, असा संघर्ष पहायला मिळेल. (शहर वार्ताहर)

शाळा बंदच्या निर्णयाविरुद्ध निवेदन

महाराष्ट्र शासनाने २० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असून, या शाळा बंदच्या निर्णयामुळे लाखो मुलांचे शैक्षणिक भवितव्य संकटात आले आहे. त्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात यावा, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. निवेदन देताना वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर ठाकरे, जिल्हा कार्याध्यक्ष शुभम गरुड, उत्तम उल्हे, जसप्रीत नन्नारे, नितीन मिर्झापुरे, राहुल गजापुरे, आकाश खैरकार, शुभम लांडगे, डॉ. प्रफुल्ल राऊत, कुंदन कुलातकर, संजय भगत, राहुल राऊत, बादल उले, सृष्टी दिवटे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Rankandan from school closure decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.