रामदास आठवले यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेशाचा जल्लोष

By Admin | Updated: July 7, 2016 02:34 IST2016-07-07T02:34:57+5:302016-07-07T02:34:57+5:30

रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए)चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल येथे जल्लोष करण्यात आला.

Ramdas Athavale to be inducted in the Union Cabinet | रामदास आठवले यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेशाचा जल्लोष

रामदास आठवले यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेशाचा जल्लोष

यवतमाळ : रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए)चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल येथे जल्लोष करण्यात आला.
स्थानिक बसस्थानक चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््याजवळ एकत्र येऊन कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) जिल्हा शाखा, दि बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््याला पुष्पमाला अर्पण करून बुद्धवंदना घेण्यात आली.
यावेळी सुखदेवराव जाधव, रामदास बनकर, गोविंद मेश्राम, धर्मपाल माने, अ‍ॅड़ रवींद्र अलोणे, म.ना. गजभिये, आर.एम. सिरसाट, अ‍ॅड़ धनंजय मानकर, अ‍ॅड़ राहुल घरडे, करुणा सिरसाट, के.आर. ब्राह्मणे, संगीता चंदनखेडे, सदाशिव भालेराव, महादेवराव अढावे, बाळासाहेब चिमुरकर, भीमराव काळपांडे, अ‍ॅड़ ज्ञानेश्वर लोखंडे, कल्याण वाठोरे, सिद्धार्थ धुळे, रवी वासनिक, सुनील पडोळे, विजय गणवीर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Ramdas Athavale to be inducted in the Union Cabinet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.