राजकुमारच्या हल्ल्यातील आरोपींना नागपुरात अटक

By Admin | Updated: June 25, 2016 02:32 IST2016-06-25T02:32:52+5:302016-06-25T02:32:52+5:30

स्थानिक चमेडिया नगरमध्ये पूर्ववैमनस्यातून राजकुमार प्रजापती याच्यावर बुधवारी गोळीबार करण्यात आला होता.

Rajkumar's attackers arrested in Nagpur | राजकुमारच्या हल्ल्यातील आरोपींना नागपुरात अटक

राजकुमारच्या हल्ल्यातील आरोपींना नागपुरात अटक

यवतमाळ : स्थानिक चमेडिया नगरमध्ये पूर्ववैमनस्यातून राजकुमार प्रजापती याच्यावर बुधवारी गोळीबार करण्यात आला होता. घटनेपासून आरोपी पसार होते. अमरावतीवरून नागपूरला जाताना त्यांना नागपूर पोलिसांनी अटक केली. या आरोपींजवळ दोन माऊझर मिळाल्याची माहिती सूत्राने दिली आहे.
गोळीबार केल्यानंतर अनिकेत गावंडे, शुभम बघेल आणि आशिष दांडेकर हे तीन आरोपी पसार झाले अक्षय राठोड टोळीतील सक्रिय सदस्य असलेल्या या आरोपींनी अमरावती मार्गे नागपूर गाठले. अक्षय राठोड हा अमरावती कारागृहात असल्याने तसेच पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी या आरोपींनी रस्ता बदलविल्याचे सांगितले जात आहे. त्यांंना नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री संशयास्पद स्थितीत अटक केली. त्यांच्यावर दरोड्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी दिली. यवतमाळ शहर पोलीस या आरोपींचा ताबा मिळविण्यासाठी प्रयत्नरत असल्याचेही त्यांनी सांगितले. नागपूर पोलिसांची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या आरोपींना ताब्यात घेतले जाईल असे सांगण्यात आले. या गुन्ह्यातील आरोपींच्या मुसक्या कायमस्वरूपी बांधण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Rajkumar's attackers arrested in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.