लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यात ७२ हजार जागांच्या भरतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. यादृष्टीने बेरोजगार तयारीला लागले. मात्र ५ आॅगस्ट रोजी या भरतीवर स्थगिती आणण्यात आली. ही स्थगिती तत्काळ उठवावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केली आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.मागील काही वर्षात स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नाला हरताय फासला जात आहे. २०१० पासून शिक्षक भरती, २०१२ पासून जलसंपदा भरती, २०१५ पासून जिल्हा परिषद आणि २०१६ पासून जिल्हाधिकारी कार्यालय आणि इतर विभागाची भरती प्रक्रिया थांबली आहे. काही दिवसांपूर्वी ७२ हजार जागांची मेगा भरतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्यालाही स्थगिती देण्यात आली. ही भरती प्रक्रिया सुरु करावी, असे या निवेदनात नमुद करण्यात आले आहे. समन्वय समितीचे आशिष रिंगोले, रोहन मस्के, गौरव शिरसागर, ऋषेश बोरूले, कैलास उलमाले, प्रशांत मोटघरे, प्रतीक भगत, युवराज आडे, गोपाल मनोहरे, माणिक टेकाम, संदीप ढाकुलकर आदींनी निवेदन दिले.महापरीक्षा पोर्टल रद्द कराकर्मचारी भरतीसाठी महाराष्ट्र शासनाने महापरीक्षा पोर्टल सुरू केले आहे. याद्वारे घेतल्या जाणाºया परीक्षांमध्ये प्रचंड अव्यवस्था, गलथानपणा आणि अपारदर्शकता आहे. यामुळे राज्यातील लाखो तरुणांचे भविष्य अंधारात लोटले जात आहे. सदर पोर्टल रद्द करून सर्व विभागाच्या परीक्षा आॅफ लाईन पद्धतीने एकाच दिवशी घेण्यात याव्या. आतापर्यंत घेतलेल्या सर्व परीक्षा रद्द करून नव्याने पारदर्शकपणे घेण्यात याव्या, असे निवेदन स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.
मेगा भरतीवरील स्थगिती उठवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 21:43 IST
राज्यात ७२ हजार जागांच्या भरतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. यादृष्टीने बेरोजगार तयारीला लागले. मात्र ५ आॅगस्ट रोजी या भरतीवर स्थगिती आणण्यात आली. ही स्थगिती तत्काळ उठवावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केली आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
मेगा भरतीवरील स्थगिती उठवा
ठळक मुद्देस्वप्नांना हरताळ : स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे निवेदन