शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हा तालुक्यात दमदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 21:58 IST

जुलै महिना उजाडताच खंड पडलेल्या पावसाचे दारव्हा तालुक्यात जोरदार पुनरागमन झाले असून दमदार पावसामुळे पिकांना संजीवनी मिळाली. पाण्याची पातळी वाढल्याने अडाण धरणासह नदी, नाल्यांच्या जलसाठ्यात भर पडली.

ठळक मुद्देशेतकरी सुखावला : ४६८ मिमीची नोंद, अडाणमध्ये ५० टक्के जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : जुलै महिना उजाडताच खंड पडलेल्या पावसाचे दारव्हा तालुक्यात जोरदार पुनरागमन झाले असून दमदार पावसामुळे पिकांना संजीवनी मिळाली. पाण्याची पातळी वाढल्याने अडाण धरणासह नदी, नाल्यांच्या जलसाठ्यात भर पडली. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे.बुधवारपर्यंत एकूण ४६८.३७ मिमी पावसाची नोंद झाली. मोठ्या प्रमाणातील पावसामुळे तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प असणाऱ्या अडाण धरणात ५० टक्के जलसाठा झाला. त्याचबरोबर इतरही प्रकल्प व नदी, नाले, विहिरीमधील पाणीपातळी वाढली आहे. यावर्षी जून महिन्यात तालुक्यात पावसाचे आगमन झाले परंतु समाधानकारक बरसल्यानंतर मोठा खंड पडला. जुलै उजाडताच मात्र चांगला पाऊस पडला. ६ जुलैपासुन सारखा पाऊस सुरू आहे. ६ जुलैला २२ मिमी, ७ ला १० मिमी, १० ला ४४ मिमी तर ११ जुलैला ४० मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे तालुक्यात पाण्याची पातळी वाढली आहे. मागील वर्षी या वेळेपर्यंत २४२ मिमी पाऊस पडला होता. या तुलनेत यावर्षी आतापर्यंत दुप्पट पाऊस झाला आहे. महत्वपूर्ण समजल्या जाणाºया म्हसणी येथील अडाण धरणात ५० टक्के जलसाठा झाला आहे. यासोबतच गोखी, अंतरगाव, कुंभारकिन्ही प्रकल्पातही पातळी वाढली आहे. गेल्या डिसेंबरपासून कोरडी पडलेली अडाण नदीसह नाले वाहायला लागले. टंचाईग्रस्त गावांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे. तालुक्यात लागवडीखाली एकूण ६३ हजार हेक्टर क्षेत्र असून यावर्षी सोयाबीन व कापूस या पारंपरिक पिकाखाली मोठ क्षेत्र आहे. समाधानकारक पावसामुळे तालुक्यातील पीक परिस्थिती चांगली आहे मात्र सततच्या चिरी-चीरी पावसामुळे मात्र शेतीच्या कामात संथ गती अली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस