महागाव तालुक्यात गावठी दारू अड्ड्यावर छापेमारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:30 IST2021-06-06T04:30:41+5:302021-06-06T04:30:41+5:30

सव्वा लाखाचां मुदेमाल सापडला फोटो महागाव : तालुक्यातील उटी आणि बिजोरा शिवारातील गावठी दारू अड्ड्यावर पाेलिसांनी शनिवारी धाड टाकली. ...

Raid on a village liquor den in Mahagaon taluka | महागाव तालुक्यात गावठी दारू अड्ड्यावर छापेमारी

महागाव तालुक्यात गावठी दारू अड्ड्यावर छापेमारी

सव्वा लाखाचां मुदेमाल सापडला

फोटो

महागाव : तालुक्यातील उटी आणि बिजोरा शिवारातील गावठी दारू अड्ड्यावर पाेलिसांनी शनिवारी धाड टाकली. या धाडीत सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईत तब्बल ११०० लीटर मोहामाच, ५० लीटर दारू मिळून आली. ठाणेदार विलास चव्हाण यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. कोरोनाकाळात ग्रामीण भागात देशी, विदेशी दारूसह गावठी दारूचा पूर वाहत आहे. पोलिसांनी मागील आठवड्यापासून गावठी दारू अड्ड्यांवर छापेमारी सुरू केली. शनिवारी येथून जवळच असलेल्या उटी येथील गणेश धुमा जाधव (५०) याच्या ताब्यातून ५०० लीटर मोहामाच सडवा आणि वसंता जेता राठोड (४५) याच्या ताब्यातून ४०० लीटर मोहामाच सडवा जप्त केला. तेथीलच संतोष रघुनाथ खिलारे याच्या ताब्यातून २०० लीटर मोहामाच सडवा व ५० लीटर गावठी हातभट्टी दारू जप्त केली.

बिजोरा येथे आरोपी राहुल भीमराव खडसे (३०) याच्या जवळून १० बॉटल देशी दारू जप्त करण्यात आली. पोलिसांनी एकूण् ११०० लीटर मोहामाच सडवा व ५० लीटर गावठी हातभट्टी दारू आणि १० देशी दारू बॉटल, असा एकूण एक लाख २० हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ठाणेदार विलास चव्हाण यांच्या नेतृत्वात दिनेश आडे, गजानन राठोड, प्रमोद पवार, संतोष जाधव, अतुल पवार यांच्या पथकाने केली.

===Photopath===

050621\img-20210605-wa0027.jpg

===Caption===

दारू अड्डयावरील मोहमाच नष्ट करतांना पोलीस शिपाई

Web Title: Raid on a village liquor den in Mahagaon taluka