पुसदमध्ये अकरा हजार हेक्टरवर रबीची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 05:00 AM2020-11-29T05:00:00+5:302020-11-29T05:00:05+5:30

यावर्षी पावसाने खरिपातील कपाशी व सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्व मदार आता रबी पिकांवर अवलंबून आहे. आतापर्यंत तालुक्यात ११ हजार ५३२ हेक्टरवर रबी पिकांची पेरणी झाली आहे. त्यात सहा हजार २९३ हेक्टरवर हरभरा तर चार हजार २३६ हेक्टरवर गव्हाची पेरणी पूर्ण झाली आहे. याशिवाय १६५ हेक्टरवर रबी ज्वारी, ९५ हेक्टरवर चारा पीक, ४२२ हेक्टरमध्ये ऊस तर ३४५ हेक्टरवर भाजीपाला पिकाची लागवड पूर्ण झाली आहे.

Rabi sowing on eleven thousand hectares in Pusad | पुसदमध्ये अकरा हजार हेक्टरवर रबीची पेरणी

पुसदमध्ये अकरा हजार हेक्टरवर रबीची पेरणी

Next
ठळक मुद्देअद्याप साडेचार हजार हेक्टर बाकी : गहू आणि हरभरावर जोर

  लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : तालुक्यातील शेतकऱ्यांनी आतापर्यंत तब्बल ११ हजार ५३२ हेक्टरवर रबी पिकांची पेरणी केली आहे. त्यात गहू आणि हरभरासह विविध पिकांचा समावेश आहे. 
यावर्षी पावसाने खरिपातील कपाशी व सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्व मदार आता रबी पिकांवर अवलंबून आहे. आतापर्यंत तालुक्यात ११ हजार ५३२ हेक्टरवर रबी पिकांची पेरणी झाली आहे. त्यात सहा हजार २९३ हेक्टरवर हरभरा तर चार हजार २३६ हेक्टरवर गव्हाची पेरणी पूर्ण झाली आहे. याशिवाय १६५ हेक्टरवर रबी ज्वारी, ९५ हेक्टरवर चारा पीक, ४२२ हेक्टरमध्ये ऊस तर ३४५ हेक्टरवर भाजीपाला पिकाची लागवड पूर्ण झाली आहे. अद्यापही चार ते चार हजार ५०० हेक्टरवर रबी पिकांची पेरणी झाली नाही. कृषी विभागाने लवकरच ही पूर्ण होण्याचा अंदाज व्यक्त केला. 
यावर्षी हरभरा पेरणीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्याखालोखाल शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी केली आहे. सध्या हरभरा खुडणीला आला आहे. काही ठिकाणी डवरणीसुद्धा सुरू झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी रबीतील पिकांना दोन पाळ्यांमध्ये पाणी दिले आहे. काही परिसरात पेरणी झालेला गहू अंकुरत आहे. शेतकरी आता रबीतील पिकांच्या सिंचनाकडे लक्ष देत आहे. खरीप हंगामातील नुकसान या पिकांमधून भरून काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी दिवसरात्र सिंचन केले जात आहे. मात्र रात्री सिंचन करताना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. रात्री सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका वाढला आहे. अनेकांना सर्पदंशाच्या घटना घडल्या आहे.

विजेअभावी शेतकऱ्यांचे हाल 
रबी हंगामातील बहुतांश पेरणी पूर्णत्वास गेली आहे. आता पिकांचे सिंचन सुरू झाले. मात्र लोडशेडींग आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांसमोर समस्या उभी ठाकली आहे. ओलितासाठी दिवसभर सलग वीज पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे. विजेअभावी अनेक शेतकऱ्यांना रात्री सिंचन करावे लागते. मात्र रात्रीच्या वेळेस वन्यप्राणी व सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका असतो. त्यामुळे सलग वीज उपलब्ध करून देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

Web Title: Rabi sowing on eleven thousand hectares in Pusad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती