आश्रमशाळा शिक्षकांचे प्रश्न मंत्र्यांच्या दरबारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 23:19 IST2017-10-07T23:18:54+5:302017-10-07T23:19:04+5:30

आदिवासी आश्रमशाळा कर्मचाºयांवर अन्याय करणारा ‘काम नाही वेतन नाही’ हा शासननिर्णय रद्द करा.

Question of Ashram School teachers | आश्रमशाळा शिक्षकांचे प्रश्न मंत्र्यांच्या दरबारी

आश्रमशाळा शिक्षकांचे प्रश्न मंत्र्यांच्या दरबारी

ठळक मुद्देशिक्षक महासंघ : ‘काम नाही वेतन नाही’ जीआर रद्द करा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आदिवासी आश्रमशाळा कर्मचाºयांवर अन्याय करणारा ‘काम नाही वेतन नाही’ हा शासननिर्णय रद्द करा. तसेच अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांचे वेतन बंद न करता त्यांचे समायोजन शासकीय आश्रमशाळेत करा, अशी मागणी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्याकडे केली आहे.
८ जून २०१६ च्या शासन निर्णयानुसार, स्वयंसेवी संस्थांकडून चालविल्या जाणाºया अनुदानित आश्रमशाळांच्या मान्यता रद्द केल्यानंतर तेथील शिक्षक व कर्मचाºयांचे समायोजन होईपर्यंतच्या कालावधीत ‘काम नाही वेतन नाही’ हे धोरण लागू करण्यात आले आहे. तसेच अतिरिक्त कर्मचाºयांचे समायोजन झाल्यानंतर त्यांचे वेतन व भत्ते सुरू होतील, असे नमूद आहे. तसेच २९ एप्रिल २०१७ च्या शासन निर्णयानुसार, विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे, वर्ग किंवा तुकडी कमी झाल्यास शाळा सुरू असूनही अतिरिक्त कर्मचाºयांचे वेतन बंद केले जाते.
परंतु, कर्मचाºयांवर हा जीआर अन्याय करणारा आहे. त्यांचे वेतन बंद न करता समायोजन होईपर्यंत वेतन सुरू ठेवावे, त्यांचे समायोजन शासकीय आश्रमशाळेत करावे, हा अन्यायकारक जीआर रद्द करावा, अशी मागणी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्याकडे केली.

Web Title: Question of Ashram School teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.