परदेशी पाहुण्यांना गावकरीच करणार गावात क्वारंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:00 IST2020-03-24T05:00:00+5:302020-03-24T05:00:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : पुण्या-मुंबईसह परदेशातूनही सध्या अनेक जण गावात परतत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशा लोकांना गावकऱ्यांमार्फत गावातच ...

परदेशी पाहुण्यांना गावकरीच करणार गावात क्वारंटाईन
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पुण्या-मुंबईसह परदेशातूनही सध्या अनेक जण गावात परतत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशा लोकांना गावकऱ्यांमार्फत गावातच क्वारंटाईन केले जाणार आहे. त्यासाठी गावपातळीवर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समित्या गठीत करण्यात आल्या असून तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांना दररोज मुख्यालयी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी सोमवारी याबाबत यंत्रणेला निर्देश दिले. त्यानुसार, गावातील तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल, ग्रामसेवक, कृषी सहायक, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर यांनी ३१ मार्चपर्यंत गावात हजर राहणे आवश्यक केले आहे.
गावात बाहेरगावातून किंवा बाहेर देशातून आलेल्या लोकांना होम क्वारंटाईन करण्यासाठी या कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली समिती गठित करण्यात आली आहे. सरपंच या समितीचे अध्यक्ष असून उपरोक्त कर्मचाºयांसह सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा यात समावेश आहे. यासह गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, गावात राहणारे पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद सदस्यही या समितीत असतील. तर पोलीस पाटील हे समितीचे सचिव आहेत. गावकºयांचेही सहकार्य यासाठी लाभणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या व्हीसीतील सूचनेनुसार या समित्या गठित करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे गावकºयांत जनजागृती होऊन आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होईल.
- कुणाल झाल्टे,
तहसीलदार, यवतमाळ
आकपुरी गावात तात्काळ अमलबजावणी
तहसीलदारांचे निर्देश येताच आकपुरीवासीयांनी ग्रामपंचायतीत बैठक घेऊन समिती गठित केली आणि कामही सुरू केले. गावात काही दिवसांपूर्वी आलेल्या नागरिकांना घरीच थांबण्याचे निर्देश दिले. या बैठकीला सरपंच बाळू कासार, उपसरपंच गजानन राऊत, ग्रामसेवक आर. पी. साव, तलाठी अरविंद गुरनुले, कृषी सहायक पूनम देवकते आदी उपस्थित होते.