शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

गुणवत्ता, विश्वासार्हता आपुलकी हेच यशाचे गमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2021 5:00 AM

रेमंड इको डेनिम प्रा.लि. लोहारा येथे संस्थेच्या रजत जयंती महोत्सव सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला लोकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा, आमदार मदन येरावार यांची मंचावर उपस्थिती होती. तत्कालीन उद्याेगमंत्री तथा पालकमंत्री जवाहरलाल दर्डा यांच्याकडे २७ वर्षांपूर्वी आम्ही गेलो होतो. रेमंड प्रकल्पासाठी जागा विचारली असता यवतमाळ आपलेच घर आहे. तुम्ही सांगाल तिथे प्रकल्पासाठी जागा देऊ, असा शब्द देत त्यांनी या प्रकल्पासाठी सर्वतोपरी मदत केली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रेमंडच्या यवतमाळ येथील प्रकल्पाला आज २५ वर्षे होत आहेत. हा दिवस रेमंड परिवाराबरोबरच यवतमाळकरांसाठीही कौतुकाचा, आनंदाचा सोहळा असल्याचे सांगत गुणवत्ता, विश्वासार्हता आणि आपुलकी हेच या उद्योगाच्या यशाचे गमक असल्याचे रेमंडचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांनी सांगितले.रेमंड इको डेनिम प्रा.लि. लोहारा येथे संस्थेच्या रजत जयंती महोत्सव सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला लोकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा, आमदार मदन येरावार यांची मंचावर उपस्थिती होती. तत्कालीन उद्याेगमंत्री तथा पालकमंत्री जवाहरलाल दर्डा यांच्याकडे २७ वर्षांपूर्वी आम्ही गेलो होतो. रेमंड प्रकल्पासाठी जागा विचारली असता यवतमाळ आपलेच घर आहे. तुम्ही सांगाल तिथे प्रकल्पासाठी जागा देऊ, असा शब्द देत त्यांनी या प्रकल्पासाठी सर्वतोपरी मदत केली. त्यावेळी १०० कर्मचाऱ्यांवर सुरू झालेल्या या प्रकल्पात आज तीन हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत असून येथील उत्पादनाला जगाच्या कानाकोपऱ्यात मागणी आहे. त्यातही यवतमाळ प्रकल्पातील उत्पादन सर्वाधिक प्रसिद्ध आहे. रेमंडच्या २५ वर्षांच्या गौरवास्पद कामगिरीबद्दल त्यांनी येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुकही केले. रेमंड केवळ कपडा उद्योगापुरताच मर्यादित राहिलेला नसून आज गृहोद्योगातही दमदार पाऊल ठेवले आहे. ठाण्यामध्ये आपण दुसऱ्या क्रमांकावर आहोत. याबरोबरच अन्न प्रक्रिया उद्योगातही आपला सहभाग असून शैक्षणिक उपक्रमासाठीही आपण पुढाकार घेतला आहे. सध्या साडेअकरा हजार विद्यार्थ्यांना आपण शिक्षण देत असून पुढील दोन वर्षांत ही संख्या २१ हजारांवर जाणार आहे. आयुष्यात किमान एक लाख विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा संकल्प केला असल्याचेही गौतम सिंघानिया यांनी सांगितले.आमदार मदन येरावार यांनी रेमंडच्या २५ वर्षांनिमित्त शुभेच्छा देत येणाऱ्या काळातही रेमंड कापड उद्योगासह इतर क्षेत्रातही अग्रेसर राहील, असा विश्वास व्यक्त केला. उद्योगासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा देण्यासाठी आमदार म्हणून सदैव प्रयत्नरत राहू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.कार्यक्रमाला माजी आमदार कीर्ती गांधी, लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, डॉ. ललित निमोदिया, ॲड. संजय लुक्का, एमआयडीसीचे आनंद भुसारी, जगजितसिंग ओबेराय, विलास देशपांडे, जाफर खान यांच्यासह गावातील निमंत्रित तसेच रेमंडच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेमंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल माथूर, तर आभार यवतमाळ रेमंडचे मुख्य संचालक नितीन श्रीवास्तव यांनी मानले.

रेमंड उद्योगाचे कार्य काैतुकास्पद - विजय दर्डालाेकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांनी रजत जयंती महोत्सव सोहळ्यानिमित्त रेमंडच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. विविध ठिकाणचे पर्याय उपलब्ध असताना रेमंडने यवतमाळवर विश्वास दाखवून येथे प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पातून आज दर्जेदार उत्पादन होत आहे याचा अभिमान असल्याचे ते म्हणाले. केवळ कापड उद्योगच नव्हे तर शिक्षण, गृहउद्योग आदीतही रेमंडने गरुडझेप घेतल्याचे सांगत, रेमंडचा नारा कम्प्लिट मॅन असा आहे. त्यांनी यवतमाळलाही आता परिपूर्ण बनवावे, असे दर्डा यांनी सांगितले. हा प्रकल्प येताना येथे नाईट लँडिंग सुविधेसह सुसज्ज विमानतळ उपलब्ध करून देण्याची ग्वाही देण्यात आली होती. मात्र, आज या विमानतळाची अवस्था दयनीय असल्याचे सांगत विजय दर्डा यांनी खंत व्यक्त केली. रेमंडला दिलेला शब्द शासनाने पूर्ण करावा, असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :Vijay Dardaविजय दर्डाRaymondरेमंड