पुसदमध्ये फोफावतेय सावकारी

By Admin | Updated: June 2, 2015 23:59 IST2015-06-02T23:59:53+5:302015-06-02T23:59:53+5:30

शहरासह तालुक्यात गत काही वर्षांपासून अवैध सावकारी फोफावली असून शेतकऱ्यांसोबतच कर्मचारी आणि कष्टीकरी

Pustalable phosphate bout | पुसदमध्ये फोफावतेय सावकारी

पुसदमध्ये फोफावतेय सावकारी

पोलिसांचे दुर्लक्ष : अव्वाच्या सव्वा व्याजाची आकारणी
पुसद : शहरासह तालुक्यात गत काही वर्षांपासून अवैध सावकारी फोफावली असून शेतकऱ्यांसोबतच कर्मचारी आणि कष्टीकरी सावकाराच्या जाळ्यात अडकले आहे. आर्थिक अडचणीत असलेले सावज हेरुन त्यांची पिळवणूक केली जात आहे. अव्वाच्या सव्वा व्याजामुळे मुद्दल रक्कम परत करणेच होत नाही. यातून अनेक जण कंगाल झाल्याचे दिसत आहे. हा प्रकार खुलेआम सुरू असला तरी पोलीस मात्र सोईस्कर दुर्लक्ष करीत आहे.
सततची नापिकी आणि निसर्गाच्या प्रकोपाने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. अवैध सावकार या परिस्थितीचा मोठा फायदा उठवित आहे. शेतकऱ्यांसोबतच अनेक कर्मचारी आणि झोपडपट्टीत राहणारे कामगारही या सावकाराचे सावज ठरत आहे. लहान मोठी रक्कम देऊन केवळ दरमहा व्याजाची वसुली केली जाते. वर्षानुवर्ष मुद्दल कायम राहते. पुसद शहरातील आंबेडकर वार्ड, तुकाराम बापू वार्ड, शिवाजी वार्ड, नवलबाबा वार्ड, गढी वार्ड, वसंतनगर, पार्वतीबाई नगर, इटावा वार्ड, भिल्लवाडी, महावीर नगर, संभाजीनगर यासह लगतच्या काकडदाती, लक्ष्मीनगर, धनकेश्वर, श्रीरामपूर, गायमुखनगर भागात मध्यमवर्गीय कष्टकरी व कामगारांचे प्राबल्य आहे. अशा मंडळींना नेहमी पैशाची चणचण भासते. कोणतीही स्थावर अथवा जंगम मालमत्ता नसल्याने बँका कर्ज देत नाही. तर बचत गटाच्या माध्यमातून कर्ज मिळविण्याचा प्रयत्न केला तर तेथेही उलटाच अनुभव येतो. तालुक्यातील काही बचत गट सावकारीत गुंतल्याचे दिसून येते.
पुसद शहरात सध्या सेठजी, सावजी, अण्णा, मामा, नाना या टोपन नावावरून ओळखले जाणारे अवैध सावकारी गुंतले आहे. खासगी नोकरीतील तुटापुंज पगार, लग्न, शिक्षण, आजारपण आदी दैनंदिन गरजा भागविण्यासाठी कर्जासाठी या सावकाराकडे धाव घेतली जाते. या सावकारांनी मोठ्या प्रमाणात व्याज आकारुन ग्राहकांची पिळवणूक सुरू केली आहे तर काही अधिकृत सावकारही कागदोपत्री व्याजदर वेगळे आणि प्रत्यक्षातील व्याजदर वेगळे आकारताना दिसत आहे. यात सामान्य नागरिक पिळला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)

वसुलीसाठी दमदाटी
सावकाराचे कर्ज घेतल्यानंतर दरमहा व्याज द्यावे लागते. एक दोन महिने व्याज थकले की सावकाराचे माणसे रात्री-अपरात्री घरी येतात. शिवीगाळ करतात. धमक्या देतात यातून वसुली केली जाते. अनेकांच्या घरच्या मंडळींना तर सावकाराचे कर्ज घेतल्याची माहितीही नसते. मात्र सावकाराचे माणसे घरी पोहोचल्यावर त्याचा भंडाफोड होतो. अनेक सावकारांनी तर वसुलीसाठी खास माणसेच पोसली आहे.

Web Title: Pustalable phosphate bout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.