पुसदच्या जुळ्या नायरा व नाजीश खानचे यश

By Admin | Updated: June 7, 2016 07:40 IST2016-06-07T07:40:39+5:302016-06-07T07:40:39+5:30

येथील हजरत उमर फारुख विद्यालयाच्या विद्यार्थिनी असलेल्या दोन जुळ्या बहिणी दहावीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण

Pusad's twin nayara and nazish khan success | पुसदच्या जुळ्या नायरा व नाजीश खानचे यश

पुसदच्या जुळ्या नायरा व नाजीश खानचे यश

पुसद : येथील हजरत उमर फारुख विद्यालयाच्या विद्यार्थिनी असलेल्या दोन जुळ्या बहिणी दहावीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाल्या आहे. वसंतनगर परिसरातील मुर्तुजा खान अयुब खान यांच्या नाजीश नायाब खान आणि नायरा नायाब खान या दोन जुळ्या मुली होय. आतापर्यंत शाळेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या नायराला ९४ टक्के तर नाजीशला ९० टक्के गुण मिळाले आहे. त्यांचा मोठा भाऊ काशीफ खान हा दहावीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत आला होता. नायरा व नाजीश या जुळ्या बहिणींना डॉक्टर व्हायचे असून नियमित अभ्यासातून यश मिळविल्याचे त्यांनी सांगितले. वडील मुर्तुजा खान हे वीज वितरण कंपनीत आॅपरेटर आहे. तर आई साहिस्ता परवीन गृहिणी आहे.

१०० टक्के निकाल देणाऱ्या शाळा
४यवतमाळ - फ्रि मेथॉडिस्ट इंग्लिश मीडियम स्कूल यवतमाळ, सेंट अलायसेस स्कूल, प्रियदर्शिनी उर्दू कन्या शाळा डोर्ली, श्री शिवाजी उर्दू शाळा रुईवाई, क्रिसेंट इंग्लिश मीडियम स्कूल, गजानन महाराज निवासी आश्रमशाळा वाघापूर, सुसंस्कार विद्या मंदिर. दारव्हा - मुंगसाजी बाबा विद्यालय धामणगाव, हजरत ख्वाजा मोहिनुद्दीन चिस्ती उर्दू हायस्कूल तळेगाव (दे), मिल्लत हायस्कूल. दिग्रस - दामोधर पाटील शाळा, विद्या निकेतन स्कूल, शासकीय अनुसूचित जाती मुलांची निवासी शाळा इसापूर, ईश्वर देशमुख बोर्डींग स्कूल. आर्णी - मातोश्री सुमित्राबाई चव्हाण दातोडी. पुसद - मनोहरराव नाईक विद्यालय सावरगाव गोरे, मुंगसाजी आदिवासी आश्रमशाळा मरसूळ, नवजीवन ज्ञानपीठ शाळा, गणपतराव पाटील शाळा बोरगडी, इंग्लिश स्कूल प्रभूनगर, शासकीय अनुसूचित जाती मुलींची निवासी शाळा आसारपेंड. उमरखेड - युनिव्हर्सल इंग्लिश स्कूल, ज्ञानज्योती स्कूल ढाणकी. महागाव - सुधाकर नाईक उर्दू विद्यालय काळी दौ., सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय. राळेगाव - शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळा किन्ही जवादे, श्री महावीर हायस्कूल, स्मॉल वंडर कॉन्व्हेंट वडकी. मारेगाव - विद्या निकेतन स्कूल. पांढरकवडा - डॉ.यार्डी स्कूल उमरी रोड, जय अंबे स्कूल, न्यू इंग्लिश स्कूल, माध्यमिक शाळा, गुरू माऊली माध्यमिक विद्यालय अर्ली. झरीजामणी - राजीव माध्यमिक विद्यालय पाटण, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, गुरूकुल कॉन्व्हेंट मुकुटबन. घाटंजी - जगदंबा विद्यालय सायतखर्डा, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा रामपूर, एसपीएम इंग्लिश मीडियम स्कूल.

Web Title: Pusad's twin nayara and nazish khan success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.