पुसदचे शेतकरी तूर खरेदीअभावी त्रस्त
By Admin | Updated: February 19, 2017 00:30 IST2017-02-19T00:30:50+5:302017-02-19T00:30:50+5:30
येथे नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. मात्र दररोज केवळ १०० ते १५० क्विंटल तूर खरेदी होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे.

पुसदचे शेतकरी तूर खरेदीअभावी त्रस्त
पुसद : येथे नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. मात्र दररोज केवळ १०० ते १५० क्विंटल तूर खरेदी होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून येथे नाफेडने तूर खरेदी केंद्र सुरू केले. मात्र या केंद्रावर दररोज १०० ते १५० क्विंटलच तुरीची खरेदी होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. मोठ्या प्रमाणात केंद्रावर तूर येत असताना खरेदी मात्र मोजकीच होत आहे. शिवाय केंद्रावर तूर ठेवण्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आपली तूर कुठे ठेवावी, असा प्रश्न पडला आहे. दरम्यान, गुरुवारी बाजार समितीने नाफेड तूर खरेदीसंदर्भात टोकण वाटप करून आचारसंहिता भंग केल्याचा आरोप होत आहे. शुक्रवारी शेतकऱ्यांनी खरेदी-विक्रीच्या कार्यालयावर मोर्चाही काढला होता. पुसद बाजार समितीकडे शासकीय हमी भावाने तूर खरेदीचा प्रारंभ झाला होता. गेल्या दोन महिन्यात आतापर्यंत सहा हजार ८४२ क्विंटल १४ किलो तूर खरेदी करण्यात आली आहे. वाशीम मार्गावरील वेअर हाऊसमध्ये नाफेडची तूर खरेदी सुरू आहे. मात्र त्याला गती देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)