पुसदच्या अभियंत्याचा कुवैतमध्ये मृत्यू

By Admin | Updated: June 17, 2015 02:15 IST2015-06-17T02:15:32+5:302015-06-17T02:15:32+5:30

सॉफ्टवेअर अभियंता असलेल्या एका तरुणाचा जलतरण तलावात पोहताना कुवैतमध्ये बुडून मृत्यू झाला. त्याच्या निधनाचे

Pusadian engineer dies in Kuwait | पुसदच्या अभियंत्याचा कुवैतमध्ये मृत्यू

पुसदच्या अभियंत्याचा कुवैतमध्ये मृत्यू

पुसद : सॉफ्टवेअर अभियंता असलेल्या एका तरुणाचा जलतरण तलावात पोहताना कुवैतमध्ये बुडून मृत्यू झाला. त्याच्या निधनाचे वृत्त पुसदमध्ये कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
पंकज पांडुरंग बिडवई (४०) असे मृत अभियंत्याचे नाव आहे. त्याने येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयातून सॉफ्टवेअर इंजिनिअरींगमध्ये पदवी संपादन केली होती. त्यानंतर तो पुण्याच्या एका कंपनीत अभियंता म्हणून रुजू झाला. त्यानंतर त्याला कंपनीने अमेरिकेला पाठविले. अलिकडेच या कंपनीने त्याला कुवैत येथे अभियंता म्हणून नियुक्ती दिली होती. कुवैत येथे एका जलतरण तलावात पोहत असताना त्याचा मृत्यू झाला. अवघ्या ४० वर्षाच्या अभियंत्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त पुसदमध्ये येताच हळहळ व्यक्त होत आहे.
पंकजचे वडील पांडुरंग बिडवई हे किराणा व्यावसायिक आहे. गत दहा वर्षांपासून बिडवई परिवार पुण्यात वास्तव्याला आहे. पंकजच्या मागे पत्नी तृप्ती, दोन मुली, आई-वडील असा परिवार आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असताना पंकज हा अत्यंत हुशार विद्यार्थी होता. त्याने आपल्या गुणवत्तेच्या बळावर यश संपादन केले. त्याच्या मृत्यूची वार्ता अमेरिकेतून पंकज खंडेलवाल यांनी दिली. त्याचा मृत्यू आम्हा सर्वांना चटका लावून गेला असे बा.ना. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. के. रवि यांनी शोकसंवेदना व्यक्त करताना सांगितले.
पंकजच्या जाण्याने बिडवई परिवारावर मोठा आघात झाला. मित्रमंडळीत लोकप्रिय असलेल्या पंकजचे पुसदमध्ये आजही अनेक मित्र आहेत. या मित्रांना त्याच्या मृत्यूची वार्ता कळताच प्रत्येकजण हळहळ करताना दिसत होता. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Pusadian engineer dies in Kuwait

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.