पुसदला उडीद, मुगाची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 21:05 IST2017-08-30T21:05:05+5:302017-08-30T21:05:26+5:30

पोळ्याच्या काळात बाजारात येणाºया उडीद, मुगाला यंदा अपुºया पावसाचा फटका बसला. काही प्रमाणात पुसदच्या बाजारात उडीद, मुगाची आवक वाढली आहे.

Pusadala grew up in Urid and Mugha | पुसदला उडीद, मुगाची आवक वाढली

पुसदला उडीद, मुगाची आवक वाढली

ठळक मुद्देभाव तेजीत : मूग पाच हजारांपर्यंत तर उडदाचे भाव ४३०० वर

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : पोळ्याच्या काळात बाजारात येणाºया उडीद, मुगाला यंदा अपुºया पावसाचा फटका बसला. काही प्रमाणात पुसदच्या बाजारात उडीद, मुगाची आवक वाढली आहे. यंदा मुगाला पाच हजारांपर्यंत तर उडीदाला ४३०० रुपये क्ंिवटल भाव मिळत आहे.
यावर्षी पुसद परिसरात अपेक्षित पाऊस झाला नाही. खरीप हंगामात तुषार सिंचनावर पिके जगली. परंतु त्याचा फटका सर्व प्रथम उडीद, मूग पिकाला बसला. उडीद, मूग पिकांंना शेंगा भरत असताना पावसाने हजेरी लावली. त्यामुळे दाणा चांगला परिपक्व झाला. परंतु उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली. गेल्या काही वर्षात शेतकरी केवळ घरी खाण्यासाठी उडीद, मुगाची लागवड करीत आहे.
गत वर्षी मुगाच्या डाळीचा भाव ८० ते १०० रुपये किलोच्यावर राहिल्याने मुगाचे क्षेत्र काही प्रमाणात वाढले आहे. स्थानिक बाजारपेठेत मुगाचे उत्पादन हाती येऊ लागले आहे. आरोग्याच्या दृष्टीनेही मुगाची डाळ आरोग्यदायी असल्याचे सांगितले जाते.
यावर्षी मुगाची आवक अल्प प्रमाणात सुरू झाली आहे. मात्र मुगाला ४५०० ते पाच हजार रुपयापर्यंत भाव मिळू लागला आहे. आवक कमी असल्याने केवळ किरकोळ व्यापारी सध्या खरेदी करीत आहे. उडदाचीही अशीच अवस्था आहे. डाळीवरील आयात बंदीमुळे बाजारात डाळींच्या किंमती तेजीत राहील, असे सांगितले जाते. सध्या भाव तेजीत असल्याने शेतकºयात समाधान दिसत आहे.

Web Title: Pusadala grew up in Urid and Mugha