पुसद तालुक्यात ८३ नागरिकांनी केली कोरोनावर मात, १०७ पॉझिटिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 05:00 IST2020-08-02T05:00:00+5:302020-08-02T05:00:22+5:30

गुरुवारी २४ तर शुक्रवारी ५० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. केवळ दोन दिवसात तब्बल ७४ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरासह तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. सतत दोन दिवस कोरोनाचा ब्लास्ट झाल्याने यंत्रणासुद्धा दबकून गेली होती. आरोग्य विभागाने नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या निकटच्या संपर्कातील संशयित रुग्णांची शोधमोहीम सुरू केली. शनिवारी जवळपास १०० नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले.

In Pusad taluka, 83 citizens have overcome corona, 107 positive patients | पुसद तालुक्यात ८३ नागरिकांनी केली कोरोनावर मात, १०७ पॉझिटिव्ह रुग्ण

पुसद तालुक्यात ८३ नागरिकांनी केली कोरोनावर मात, १०७ पॉझिटिव्ह रुग्ण

ठळक मुद्देएकूण बाधित १९६ । आतापर्यंत सहा जणांचे बळी, संशयितांची शोधमोहीम सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : शहर व तालुक्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या १९६ वर पोहोचली आहे. यातील सहा जणांचे मृत्यू झाले तर ८३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे तालुक्यात तूर्तास अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या १०७ झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहर व तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. गुरुवारी २४ तर शुक्रवारी ५० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. केवळ दोन दिवसात तब्बल ७४ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरासह तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. सतत दोन दिवस कोरोनाचा ब्लास्ट झाल्याने यंत्रणासुद्धा दबकून गेली होती. आरोग्य विभागाने नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या निकटच्या संपर्कातील संशयित रुग्णांची शोधमोहीम सुरू केली. शनिवारी जवळपास १०० नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापूर्वीचे २२१ स्वॅबचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे. याशिवाय यंत्रणेने दोन हजार रॅपिड टेस्ट किटची मागणी केल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड यांनी दिली.
सध्या शहरात चार प्रतिबंधित क्षेत्र आहे. या क्षेत्रात पालिकेतर्फे घरोघरी जावून नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. प्रत्येक वॉर्डात फवारणी सुरू असल्याचे मुख्याधिकारी डॉ.किरण सुकलवाड यांनी सांगितले. कोरोना नियंत्रित करण्यासाठी ट्रेसिंग, टेस्टींग व ट्रिटमेंट सूत्रीचा अवलंब केला जात असल्याचे डॉ.व्यंकट राठोड यांनी सांगितले. दरम्यान शनिवारी सायंकाळी तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या १०९ वर पोहोचली असल्याचे एसडीओ डॉ.व्यंकट राठोड यांनी सांगितले.

आसारपेंड येथील कोविड सेंटरची साफसफाई
शहर व तालुक्यात दिवसेंदिवस रुग्णसंख्येत भर पडत आहे. त्यामुळे यंत्रणेची धावपळ सुरू आहे. संशयित रुग्णांना आसारपेंड येथील कोविड सेंटरमध्ये ठेवले जाते. या सेंटरची साफसफाई केली जात आहे. दररोज सफाई कर्मचारी कोविड सेंटर व बाजूचा परिसर स्वच्छ करीत आहे. संशयितांना कोणताही त्रास होवू नये याची दक्षता घेतली जात असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशीष पवार यांनी सांगितले. याशिवाय शहरातील आयुर्वेद महाविद्यालयामध्ये कोविड सेंटर आहे. तेथेही स्वच्छतेची पुरेपूर काळजी घेतली जात असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: In Pusad taluka, 83 citizens have overcome corona, 107 positive patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.