शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
3
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
4
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
5
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
6
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
7
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
8
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
9
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
10
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

पुसद एमआयडीसीतील उद्योगांवर अवकळा

By admin | Published: October 12, 2014 11:37 PM

बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पुसद एमआयडीसीतील उद्योगांवर भारनियमन आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे अवकळा आली आहे. ३० उद्योग तर अखेरच्या

पुसद : बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पुसद एमआयडीसीतील उद्योगांवर भारनियमन आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे अवकळा आली आहे. ३० उद्योग तर अखेरच्या घटका मोजत असून प्रशासकीय यंत्रणेच्या निष्क्रीयतेने औद्योगिक विकासाचे स्वप्न भंगले आहे. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या प्रयत्नाने १९९२-९३ मध्ये पुसद येथे औद्योगिक वसाहत मंजूर झाली. दिग्रस मार्गावरील धुंदी घाटोळी परिसरात १६९ हेक्टर भूखंड घेण्यात आला. मुख्य रस्त्यालगत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ असा मोठा फलक लावला आहे. फलकापासून दूरवर दिसणारी ओसाड जमीन आणि औद्योगिक वसाहत आपली व्यथा सांगताना दिसत आहे. उद्योगाच्या घरी रिद्धीसिद्धी पाणी भरी, असे म्हणतात, परंतु औद्योगिक वसाहतीत कोणी चिटपाखरुही फिरकताना दिसत नाही. या संपूर्ण परिसरात पसरलेली उदासीनता क्षणाक्षणाला जाणवते. सरकारी नोकरीचा ध्यास लावून बसलेल्या तरुणांना शासनाने उद्योजक होण्याचे आवाहन केले. परंतु येथील एमआयडीसी उद्योगासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत गरजांची पूर्तताच केली नाही. त्यामुळे एमआयडीसीतील ९० टक्के भूखंड रिकामे आहे. सुरुवातीचे सहा वर्षतर या परिसरात एकही उद्योग आला नाही. १६ वर्षापूर्वी मोठा उद्योग नाही परंतु एका उद्योजकाने निंबाळी खताचा उद्योग उभारला. त्यानंतर हळूहळू ३० उद्योग या ठिकाणी सुरू झाले. त्यात तीन आईस फॅक्टरी, दोन बायोकोल, दोन मिनरल वॉटर पॅकिंग प्लाँट, कागद कारखाना, जिनिंग निंबाळी खत, सिमेंट वॉटर टँक, वीज खांब निर्मिती उद्योग, दूध डेअरी आदींचा समावेश आहे. सुरुवातीला भरभराटीस आलेल्या या उद्योगांना अलिकडे भारनियमनाचा मोठा फटका सहन करावा लागतो. कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने मशनरी नष्ट होण्याची भीती असते. तसेच उद्योगासाठी लागणारा पाणीपुरवठाही अनियमित आहे. त्यामुळे पाण्याचा साठा करावा लागतो. परंतु तेही शक्य होत नाही. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या आग्रहास्तव पुसदच्या एमआयडीसीला स्पेशल दर्जा देण्यात आला. परंतु सुविधा मात्र मिळाल्या नाही. या एमआयडीसीत विजेसाठी अतिरिक्त फिडरची गरज आहे. परंतु ही व्यवस्था येथे नसल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. वीज समस्येबाबत येथील उद्योजकांनी वारंवार वरिष्ठांना कळविले. परंतु कुणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे आता तर अनेकांनी येथील उद्योग गुंडाळण्याची तयारी चालविली आहे. यामुळे येथील उद्योगाला अखेरची घरघर लागली असून एमआयडीसी ओस पडत आहे. (तालुका प्रतिनिधी)