पुसद : पुसद मतदार संघ म्हणजे नाईक घराणे, असे समीकरण झाले आहे. १९५२ पासून या मतदारसंघावर नाईकांचे वर्चस्व आहे. नाईकांच्या या अभेद्य गडाला आजपर्यंत कुणीही खिंडार पाडू शकले नाही. निवडणुकीत विरोध करणारे विरोधकही काही दिवसातच नाईकांशी जुळवून घेतात, हा पुसदचा इतिहास आहे. पुसद विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या तिकिटावर मनोहरराव नाईक निवडणूक रिंगणात आहे. ही निवडणूक सर्वत्र चौरंगी होत असली तरी पुसदमध्ये नाईकांच्या गडाला धक्का लागण्याची शक्यताच दिसत नाही. विरोधकांनी नाईकांच्या या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधक कधीही त्यात यशस्वी झाले नाही. येथे विरोधी पक्षच सक्षम दिसत नाही. विरोधी पक्षातले नेतेही शेवटी नाईकांभोवती फिरताना दिसतात. मनोहरराव नाईकांची ही सहावी विधानसभा निवडणूक आहे. मनोहरराव नाईकांची या मतदारसंघावर मोठी पकड आहे. बंगल्यातून सर्व राजकीय सूत्र चालविली जातात. सहकार असो की जिल्हा परिषद, पंचायत समिती नाईकांचा शब्द तेथे प्रमाण मानला जातो. बंजाराबहुल या मतदारसंघात इतर समाजाचेही मोठे समर्थन मनोहरराव नाईकांना मिळत आहे. आजची परिस्थिती अशी आहे की पुसदमध्ये नाईकांमुळेच पक्ष ओळखला जातो. मनोहरराव नाईक कोणत्याही पक्षात असले तरी त्यांचा प्रभाव कधी कमी होत नाही. पुसद मतदारसंघाच्या विकासात नाईक घराण्याचा मोठा वाटा आहे. या निवडणुकीतही त्याचा प्रत्यय गावागावात येत आहे. उत्स्फूर्तपणे जमणारी मंडळी हेच या निवडणुकीतील वैशिष्ट्य आहे. आता १५ आॅक्टोबरला मतदान होत असले तरी या मतदारसंघात कोठेही हवी तशी हालचाल दिसत नाही.उत्स्फूर्तपणे प्रचार कार्यात ग्रामस्थ आणि नागरिक सहभागी होत आहे. खुद्द मनोहरराव नाईकांच्या आदेशाची वाट न पाहताच स्वयंस्फूर्तीने अनेकजण प्रचारात उतरतात. निवणुकीतील मनोहरराव नाईकांचा प्रचार हा केवळ सोपस्कार असतो. भाऊ या नावाने परिचित असलेले मनोहरराव नाईक रिंगणात आहेत. इतकीच माहित त्यांच्या विजयासाठी पुरेसी ठरते. नाईक कुटुंबियांनी प्रचंड लोकसंग्रह केला आहे. विशेष म्हणजे मतदार संघातील पिढन्पिढ्यावर नाईक घराण्याची छाप कायम आहे. सर्वच वयोगटातील मतदारांमध्ये त्यांची लोकप्रियता दिसून येते. कामाची शैली आणि अडचणी सोडविण्याचे हक्काचे ठिकाण म्हणुन पुसदच्या बंगल्याकडे पाहण्यात येते. त्यामुळेच जनसामन्यांचा गराडा त्यांच्या भोवती कायम असतो.
पुसदची ओळख नाईक घराण्यामुळेच
By admin | Updated: October 12, 2014 23:37 IST