शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

पुसद, दिग्रस कोरोनामुळे सात दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 05:00 IST

सद्यस्थितीत पुसद तालुक्यात ५९ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण असून तालुक्यातील एकंदर कोरोनाबाधितांची संख्या ७७ एवढी झाली आहे. चार जण कोरोना बळी ठरले आहे. दिग्रस तालुक्यात अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ३७ एवढी असून तालुक्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ९४ वर पोहोचला आहे. तर कोरोनामुळे दोन जणांना जीव गमवावा लागला. त्यामुळे प्रशासनाने या दोन्ही ठिकाणी २२ ते २८ जुलैपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन घोषित केला आहे.

ठळक मुद्दे२२ ते २८ जुलै : औषधी दुकाने वगळता बाजारपेठ बंद, पुसदमध्ये ५९ तर दिग्रसमध्ये ३७ कोरोनाचे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद/दिग्रस : गेल्या काही दिवसात दिग्रस व पुसद तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी पुसद आणि दिग्रस शहर व लगतच्या परिसरात प्रशासनाने सात दिवसांचा कडकडीत बंद घोषित केला आहे. या कालावधीत औषधी दुकाने वगळता बाजारपेठ बंद ठेवली जाणार आहे.सद्यस्थितीत पुसद तालुक्यात ५९ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण असून तालुक्यातील एकंदर कोरोनाबाधितांची संख्या ७७ एवढी झाली आहे. चार जण कोरोना बळी ठरले आहे. दिग्रस तालुक्यात अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ३७ एवढी असून तालुक्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ९४ वर पोहोचला आहे. तर कोरोनामुळे दोन जणांना जीव गमवावा लागला. त्यामुळे प्रशासनाने या दोन्ही ठिकाणी २२ ते २८ जुलैपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन घोषित केला आहे. या सात दिवसात केवळ दवाखाने व औषधी दुकाने सुरू राहतील. उर्वरित सर्व सेवा बंद ठेवल्या जाणार आहे.गेल्या एक आठवड्यापासून पुसद उपविभागातील दिग्रस शहर व तालुका आणि पुसद शहर व ग्रामीण भागात रुग्ण झपाट्याने वाढले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आमदार इंद्रनील नाईक, आमदार अ‍ॅड.निलय नाईक, आमदार डॉ.वजाहत मिर्झा यांनी सोमवारी पालकमंत्री संजय राठोड व जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांना लॉकडाऊन करण्याबाबत पत्राद्वारे विनंती केली. तसेच पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांच्या नेतृत्वात शहरातील सर्व राजकीय पक्ष, व्यापारी संघटना, पदाधिकारी, पत्रकार, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आदींची झूम मिटींग घडवून आणली. त्यानुसार उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांनी सोमवारीच २२ ते २८ जुलैपर्यंतच्या लॉकडाऊनचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री उशिरा पुसद व दिग्रस या दोन तालुक्यांसाठी संपूर्ण लॉकडाऊनचा आदेश काढला.पुसद व दिग्रस शहर आणि तालुक्याच्या ग्रामीण भागात सोशल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसत नाही. अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडतात. अनावश्यक प्रवास करतात. बाजारात गर्दी करतात. तर अनेकजण मास्क व सॅनिटायझरचा वापर करीत नाही. घराच्या आजूबाजूला जमाव करून बसतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्याला आळा घालण्यासाठी प्रशासनाने सोमवारी कठोर पाऊल उचलले. जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांच्या मार्गदर्शनात २२ ते २८ जुलैपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले.मॉर्निंग व इव्हीनिंग वॉकलाही बंदीलॉकडाऊनच्या काळातील सात दिवस दवाखाने व औषधी दुकाने वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद राहणार आहे. यात किराणा व भाजीपाला दुकानांचाही समावेश आहे. याशिवाय मॉर्निंग व इव्हीनिंग वॉकलाही बंदी घालण्यात आली आहे. मात्र प्रिंट मीडिया, ईलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी, वार्ताहर तसेच वर्तमानपत्र वितरक यांना घरपोच वर्तमानपत्र वाटपासाठी मुभा आहे. दूध विक्री व संकलनासाठी सकाळी ७ ते १० व सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत मुभा आहे. पेट्रोलपंप सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत सुरू राहतील. शिवाय शेतीच्या संपूर्ण कामास मुभा आहे. अंत्यविधी व लग्नासाठी मुभा आहे.नियमांचे उल्लंघन केल्यास फौजदारीचा इशारासोमवारी रात्री पुसदच्या रहेमतनगरमधील ७२ वर्षीय पुरुष आणि मंगळवारी वसंतनगरमधील पाच महिला असे सहा जण नव्याने पॉझिटिव्ह आले. पुसद आणि दिग्रस शहरातील जनतेने सात दिवस संचारबंदीचे तंतोतंत पालन करावे, अन्यथा दंडात्मक आणि फौजदारी कारवाई केली जाईल असा इशारा उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड यांनी दिला आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या