पुसद @ ९४ टक्के

By Admin | Updated: May 28, 2015 01:59 IST2015-05-28T01:59:46+5:302015-05-28T01:59:46+5:30

बारावीच्या परीक्षेचा तालुक्याचा निकाल ९३.७२ टक्के लागला आहे. चार शाळांनी १०० टक्के निकाल दिला असून शहरातून लोकहित ज्युनिअर कॉलेज अव्वल राहिले.

Pusad @ 9 4 percent | पुसद @ ९४ टक्के

पुसद @ ९४ टक्के

बारावीचा निकाल : चार महाविद्यालयांनी गाठली शंभरी
पुसद : बारावीच्या परीक्षेचा तालुक्याचा निकाल ९३.७२ टक्के लागला आहे. चार शाळांनी १०० टक्के निकाल दिला असून शहरातून लोकहित ज्युनिअर कॉलेज अव्वल राहिले. तालुक्यातून तीन हजार २५ विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. त्यातील दोन हजार ८३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. २८३ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांपैकी १५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. त्यांच्या यशाची टक्केवारी ५२.४२ एवढी आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी १ वाजता जाहीर झाला. यासोबतच निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची सायबर कॅफेवर झुंबड उडाली. यशस्वी विद्यार्थी आनंदोत्सव साजरा करत होते.
तालुक्यातील संभाजी पांडे ज्युनिअर कॉलेज, वसंतराव नाईक आश्रमशाळा चिखली, उच्च माध्यमिक विद्यालय घाटोडी आणि शिवाजी ज्युनिअर कॉलेज भोजलाचा निकाल १०० टक्के लागला. लोकहित ज्युनिअर कॉलेज ९८.११ टक्के निकाल देत शहरातून प्रथम स्थानी राहिले. हर्षी येथील शिवाजीराव मोघे ज्युनिअर कॉलेजचा निकाल सर्वात कमी ७३.९१ टक्के लागला आहे.
पुसद तालुक्यात एकूण ३९ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यातील शहरात नऊ तर ग्रामीण भागात ३० कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश आहे. लोकहित कॉलेजमधील ५४ पैकी ५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यानंतर विश्वनाथसिंह बयास नगरपरिषद ज्युनिअर कॉलेज (९७.२२), शिवाजी ज्युनिअर कॉलेज (९७.०४), जी.एन. आझाद उर्दू ज्युनिअर कॉलेज (९६.८९), को.दौ. विद्यालय (९६.२८), श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला कॉलेज (९४), वसंतराव नाईक ज्युनिअर कॉलेज (९२.७३), पी.एन. कॉलेज (८९.४१) आणि उर्दू ज्युनिअर कॉलेज (४८.८९) या शहरातील शाळा-महाविद्यालयांनी निकाल दिला आहे.
तालुक्याच्या ग्रामीण भागात शिवाजी ज्युनिअर कॉलेज बेलोरा (९७.२२), शिवाजी ज्युनिअर कॉलेज जांबबाजार (९७.२२), गुणवंतराव देशमुख ज्युनिअर कॉलेज कवडीपूर (९७.६२), रामू नाईक ज्युनिअर कॉलेज वरूड (९८.५९), बाबासाहेब नाईक ज्युनिअर कॉलेज पारवा (८६.२७), अब्दुल रशीद मेमोरिअल ज्युनिअर कॉलेज शेंबाळपिंपरी (९०.२४), नामदेवराव मळघणे ज्युनिअर कॉलेज मरसूळ (९३.५२), दत्तराव देशमुख ज्युनिअर कॉलेज शेंबाळपिंपरी (८९.४७), राष्ट्रीय ज्युनिअर कॉलेज अडगाव (९५.८३), मुंगसाजी आश्रमशाळा माणिकडोह (९७.९२), सुधाकरराव नाईक ज्युनिअर कॉलेज रोहडा (८४.४४), वसंतराव पुरके ज्युनिअर कॉलेज बोरगडी (९६.८८), मनोहरराव नाईक ज्युनिअर कॉलेज लोहरा (९२), उच्च माध्यमिक विद्यालय काटखेडा (९६.९२), सुधाकरराव नाईक ज्युनिअर कॉलेज जनुना (९२.३१), जगदंबा ज्युनिअर कॉलेज शेलू (९४.२९), संत गजानन महाराज ज्युनिअर कॉलेज लाखी (९०.९१), सुधाकरराव नाईक ज्युनिअर कॉलेज काकडदाती (७८.२६), व्हीजेएन आश्रमशाळा सावरगाव(बंगला) (८७), शासकीय आश्रमशाळा हर्षी (८७.७६), जनता शिक्षण प्रसारक मंडळ ज्युनिअर कॉलेज (९४.७४) या महाविद्यालयांनी चांगला निकाल दिला आहे. आॅनलाईन निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी सायबर कॅफेवर मोठी गर्दी झाली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Pusad @ 9 4 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.